एक्स्प्लोर

Megha Dhade: अभिनेत्री मेघा धाडेची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'कलाकारांना पक्षाशी जोडून...'

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी मेघा धाडेची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Megha Dhade: अभिनेत्री मेघा धाडेनं (Megha Dhade) काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये (Bharatiya Janata Party) प्रवेश केला.  सोशल मीडियाच्या माध्यमातून मेघानं ही माहिती चाहत्यांना दिली होती. आता भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी मेघा धाडेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकतीच याबाबत मेघानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.   

मेघानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये  चंद्रशेखरजी बावनकुळे  (Chandrashekhar Bawankule)  आणि प्रियाताई बेर्डे (Priya Berde)  हे दिसत आहेत. या फोटोला मेघानं कॅप्शन दिलं, 'भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेश महामंत्री माननीय विजयजी चौधरी, माझी लाडकी सांस्कृतिक प्रकोष्ठची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा प्रियाताई बेर्डे यांच्या उपस्थितीत माझी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माझ्याबरोबर अनेक कलाकारांचे पक्षप्रवेश करण्यात आले.मला प्रिया ताईनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून जोमाने काम करीन. हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Megha Dhade (@meghadhade)

मेघानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर एक खास पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Megha Dhade (@meghadhade)

अनेक कलाकार गेल्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये एन्ट्री करताना दिसत आहेत. अभिनेता अभिजीत केळकरनं देखील  भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. तसेच सौरभ गोखले यानं देखील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

 मेघा धाडेला बिग बॉसमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मेघा ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती ठरली. तसेच मेघानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं हिंदी बिग बॉसच्या 12 सीझनमध्ये देखील सहभाग घेतला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Megha Dhade: 'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; भाजपामध्ये केला प्रवेश

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Megha Ghadge on Ashok Saraf: 'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
Colors Marathis Mi Jinkun Ghein Saar: 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
Bigg Boss Season 20 Mahhi Vij: 'नशीब, माझे अंतर्वस्त्रही धुऊन द्या, असं म्हटलं नाही'; 'बिग बॉस 20'मध्ये पहिल्या दिवसापासून हायव्होल्टेज ड्रामा, माही विजची बॉसगिरी
'नशीब, माझे अंतर्वस्त्रही धुऊन द्या, असं म्हटलं नाही'; 'बिग बॉस 20'मध्ये पहिल्या दिवसापासून हायव्होल्टेज ड्रामा, माही विजची बॉसगिरी
Salman Khan bigg boss: '...या डरा रहा है?'; पुण्याच्या रॅपरची बिग बॉसच्या घरात एन्ट्री, स्पर्धकाच्या गावाचं नाव ऐकून का दचकला सलमान खान, म्हणाला...
'...या डरा रहा है?'; पुण्याच्या रॅपरची बिग बॉसच्या घरात एन्ट्री, स्पर्धकाच्या गावाचं नाव ऐकून का दचकला सलमान खान, म्हणाला...

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
Embed widget