एक्स्प्लोर

बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर सई-पुष्करबद्दल मेघा म्हणते....

मला विश्वास बसत नाही, पण मनात कुठेतरी विश्वास होता. विश्वास घेऊनच बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवलं होतं, असं मेघा धाडे म्हणाली. ती एबीपी माझाशी बोलत होती.

मुंबई: अभिनेत्री मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’ची पहिली विजेती ठरली आहे. फायनलमध्ये अभिनेता पुष्कर जोगवर मात करत, मेघाने विजेतीपदाची ट्रॉफी उंचावली. पुष्कर जोग बिग बॉसचा उपविजेता ठरला. मला विश्वास बसत नाही, पण मनात कुठेतरी विश्वास होता. विश्वास घेऊनच बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवलं होतं, असं मेघा धाडे म्हणाली. ती एबीपी माझाशी बोलत होती. घरात एण्ट्री केली तेव्हा दिग्गजांची 18 जणांची फौज समोर होती. मी त्यांच्यात स्वत:ला खूपच नवखी समजत होते. पण म्हटलं ठिक आहे ना यार, जेव्हा खूप इम्पॉसिबल चित्र दिसतं, तेव्हाच ते पॉसिबल करण्यात आयुष्याची मजा असते, असं मेघाने नमूद केलं. इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो, हे आजच्या विजयावरुन पुन्हा समजलं. यावेळी मला शाहरुखचा तो डायलॉग आठवतो, “इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है...कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है”, असं मेघाने सांगितलं. यावेळी मेघाला विचारलं, कधी वाटलं का बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं? त्यावर मेघा म्हणाली, “मला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं हे एकाच दिवशी वाटलं. शंभर दिवसातला एक दिवस वाटलं बाहेर जावं. ज्यांच्यासाठी मी कधी कधी माझा गेम कॉम्प्रमाईज केला. माझे जीवलग मित्र –मैत्रिण पुष्कर आणि सई यांनी मला जेव्हा विश्वासघातकी बोलले, तेव्हा मी तुटले होते. ते माझे मित्र होते आणि कायम राहतील. मी डिसलॉयल, विश्वासघाती कुणाशीच नव्हते. ना बिग बॉसशी, ना स्वत:शी, ना माझ्या मित्र मैत्रिणींशी. मी खूप प्रामाणिक खेळले. जेव्हा तुम्ही काहीही केलं नसताना आरोप ऐकायला मिळतात आणि आरोप करणारे तुमचे आपले असतात, तेव्हा खूप त्रास होतो. तेव्हा वाटलं होतं मला इथे राहायचं नाही. पण दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग साँग लागलं आणि मी सगळं सोडून दिलं.” मनं जिंकल्याशिवाय ट्रॉफी जिंकता येत नाही लोक माझ्यावर प्रेम करतायेत हे जाणवत होतं. मनं जिंकायची होती. मनं जिंकल्याशिवाय ट्रॉफी जिंकता येत नाही. मी डोक्याने खेळते, मनाने खेळत नाही, असं लोक म्हणायचे. पण नाही...जर मनं जिंकाल तर ट्रॉफी जिंकाल. नुसतं डोक्याने खेळून जिंकू शकत नाही. बिग बॉस केवळ एक टास्क किंवा स्पर्धा नाही. तुम्ही माणूस म्हणून किती खरे, किती सच्चे आहात हे दिसून येतं. घरातील कॅमेरे खोटे बोलू शकत नाहीत, असं मेघाने सांगितलं. मी राग आला तर राग दाखवला, प्रेम दाखवलं, भावनांना वाट करुन दिली, टास्कच्यावेळी ताकद दाखवली.. मी जशी आहे तशी प्रेक्षकांसमोर दाखवलं. त्या घरात पारदर्शी राहणं हे महत्त्वाचं होतं. लोक तुम्हाला ओळखतात..तुम्ही माणूस आहात, त्यामुळे तुम्ही 100 टक्के परफेक्ट असू शकत नाही. जर तसं कुणाला वाटत असेल ना तर झोल आहे. माझ्यातही काही वाईट, दुर्गुण आहेत. मला राग येतो कारण मी माणूस आहे, असं मेघाने नमूद केलं. मी बिग बॉसच्या घरात राहून स्वत:चा प्रवास पाहिला. बिग बॉसने माझी चित्रफित दाखवली तो क्षण माझ्यासाठी खास होता. मी विनर असल्याचा आनंद त्यावेळी मला होता. संबंधित बातम्या :  आस्तादला सुरक्षित करुन रेशम टिपणीस 'बिग बॉस'मधून बाद  रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार

महत्त्वाच्या बातम्या

Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
Ram Kapoor in lock up 2: 'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Khalid Ka Shivaji Marathi Movie: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
Embed widget