एक्स्प्लोर

BIG BOSS MARATHI 2 | माझ्यामुळे मेघा धाडे विजेती, शिवानी सुर्वेच्या दाव्यावर मेघा म्हणते...

'माझ्यामुळे मेघा धाडे पहिल्या पर्वाची विजेती ठरली, माझ्या मार्गदर्शनामुळे ती जिंकली. तिचे घरातील कपडे आणि स्टाईल बाबतही मीच सल्ला दिला होता' असं म्हणत बिग बॉस मराठी 2 ची स्पर्धक शिवानी सुर्वेने मेघाच्या विजयाचं श्रेय घेतलं.

मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली, तशी स्पर्धकांची भांडणं, हेवेदावे, थोडक्यात 'राडा'ही सुरु झाला. 'देवयानी' फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच मेघा धाडेच्या विजयाचं श्रेय घेतलं. मात्र आपल्याकडून टिप्स घेतल्याचा शिवानीचा दावा मेघा धाडेने फेटाळून लावला आहे. शिवानी सुर्वेने देवयानी, सुंदर माझं घर, जाना ना दिल से दूर यासारख्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. अभिजीत बिचुकलेसोबत घडणारी तू-तू-मै-मै असो, किंवा शेफ पराग कान्हेरेसोबत झालेली वादावादी, बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून शिवानी चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी शिवानीने वेगळाच दावा केला होता. 'माझ्यामुळे मेघा धाडे पहिल्या पर्वाची विजेती ठरली, माझ्या मार्गदर्शनामुळे ती जिंकली. तिचे घरातील कपडे आणि स्टाईल बाबतही मीच सल्ला दिला होता' असं म्हणत शिवानीने मेघाच्या विजयाचं श्रेय घेतलं. मेघाने मात्र शिवानीचे सगळे दावे फेटाळून लावले आहेत. शिवानी आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत. त्यामुळे सगळे जण तिला विचारत होते, की तिने बिग बॉसच्या घरात शिरण्यापूर्वी माझ्याकडून काही सल्ले घेतले आहेत का? त्यामुळे वैतागलेल्या शिवानीने कदाचित उपहासाने उत्तर दिलं असावं, की तीच माझी गुरु आहे, असं म्हणत मेघाने शिवानीची बाजू सावरुन धरली आहे. 'मी कोणाकडूनही टिप्स घेतल्या नव्हत्या. मुळात बिग बॉस मराठीचा पहिलाच सिझन असल्यामुळे कोणालाच आधी त्याबाबत तर्क लढवता आले नव्हते.' असंही मेघा म्हणाली. ढॅण्टॅढॅण | 'बिग बॉस'च्या घरात जाण्याआधी मेघा धाडे हिच्याशी खास गप्पा मेघाचे फेवरेट कोण? अभिनेत्री किशोरी शहाणे आणि अभिनेते विद्याधर जोशी अर्थात बाप्पा यांचा खेळ आपल्या आवडतो. 'रोडिज्' फेम शिव ठाकरे आपला फेवरेट स्पर्धक असल्याचं मेघा म्हणाली. शिवला खुलण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. मला वाटतं तो लंबी रेस का घोडा आहे, असंही मेघाने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. अभिजीत बिचुकलेबद्दल काय म्हणते मेघा? अभिजीत बिचुकले हा काही मृदूभाषी नाही. पण याचा अर्थ त्याला टार्गेट केलं जाता कामा नये. तो लक्ष केंद्रित करुन घेण्यासाठी खेळत नाहीये. मात्र तो इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे कॅमेरेच त्याला फॉलो करत आहेत, असं मेघाला वाटतं. सुरेखा पुणेकर, किशोरी शहाणे-वीज, मैथिली जावकर, वैशाली माडे, अभिजीत केळकर, अभिजीत बिचुकले यासारखे तगडे कलाकार यंदा बिग बॉसच्या पर्वात दिसत आहेत. नेहा शितोळे, वीणा जगताप, माधव देवचक्के, शिवानी सुर्वे, रुपाली भोसले यासारखे तरुण चेहरेही बिग बॉसचा भाग आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Sunetra Pawar and Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट, जयंत पाटील सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'मनात कोणताही किंतू बाळगू नका, काही मदत लागली तर...'
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट, जयंत पाटील सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'मनात कोणताही किंतू बाळगू नका, काही मदत लागली तर...'
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
Embed widget