(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: "सर, तुम्ही आलात म्हणून मी आलो…"; झापुक झुपूक सूरजची रितेश भाऊला कडकडून मिठी, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi Season 5 : यंदाच्या पर्वाच्या होस्टिंगची जबाबदारी पहिल्यांदाच महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुखनं आपल्या खांद्यावर घेतली होती. आणि अखेरपर्यंत ती यशस्वीरित्या पार पाडली देखील.
Bigg Boss Marathi Season 5 : प्रसिद्ध रिअॅलिटी शो (Reality Show) बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) नुकताच ग्रँड फिनाले (Grand Finale) सोहळा पार पडला. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी सूरज चव्हाणनं (Suraj Chavhan) आपल्या गुलिगत पॅटर्ननं जिंकली. यंदाचं सीझन फारच चर्चेत होतं. तसेच, सर्वाधिक गाजलेल्या रिअॅलिटी शोच्या पर्वामध्ये बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा समावेश करण्यात आला. यंदा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझननं 100 ऐवजी 70 दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरीदेखील संपूर्ण पर्वाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, टीआरपीचे सर्व उच्चांक या रिअॅलिटी शोनं मोडीत काढले.
यंदाच्या पर्वाच्या होस्टिंगची जबाबदारी पहिल्यांदाच महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुखनं आपल्या खांद्यावर घेतली होती. आणि अखेरपर्यंत ती यशस्वीरित्या पार पाडली देखील. पर्वाची सांगता झाल्यानंतर रितेश देशमुखनं आपल्या इन्स्टा हँडलवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये रितेशनं ग्रँड फिनाले सोहळ्याची एक झलक सर्वांना दाखवली आहे.
बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्क्याची जबाबदारी रितेश देशमुखच्या खांद्यावर होती. पण, त्याच्या इतर कामांमुळे दोन आठवड्यांसाठी तो भाऊच्या धक्क्यावर नव्हता. तो लंडनला शुटींगसाठी गेला होता. त्यानंतर वेळात वेळ काढून रितेश फक्त ग्रँड फिनालेसाठी भारतात परतला होता. 'बिग बॉस'च्या सेटवर रितेश देशमुखची ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत केलं. ग्रँड फिनालेच्या वेळी महाराष्ट्राचं लाडकं कपल रितेश भाऊ आणि जिनेलिया वहिनी एकत्र दिसून आलं. बिग बॉसच्या विजेत्याची अनाउंसमेंट रितेशनं केली आणि सूरजला ट्रॉफी दिली. त्यानंतर रितेशनं सूरजसोबत सेल्फी काढला. सर्व सोहळा आटोपल्यानंतर विजेत्या सूरजनं बॅकस्टेजला जाऊन रितेश-जिनिलीयाची भेट घेतली.
सूरज रितेशकडे गेला आणि त्यानं रितेशला कडकडून मिठी मारली. रितेशनंसुद्धा त्याला जवळ घेऊन त्याचं कौतुक केलं. यावेळी सूरज त्याला म्हणाला, "सर, मला लय बरं वाटतंय" त्यानंतर रितेश म्हणाला की, "मला तुमचा फार अभिमान आहे. कारण हा माझा पहिला शो आहे आणि यंदा तुम्ही ही ट्रॉफी जिंकली" त्यानंतर मागचा पुढचा विचार न करता सूरज थेट रितेशला एक वाक्य बोलतो आणि त्यामुळे मागे उभी असलेली जिनिलिया अगदी खळखळून हसू लागते.
View this post on Instagram
सूरज रितेशला म्हणाला की, "अहो सर, तुम्ही आलात म्हणूनच मी आलो, नाही. मी खरंच बोलतोय… जेव्हा मला समजलं ना तुम्ही आहात यावर्षी म्हटलं जायचं… आता झापुक झपूक पॅटर्न दाखवू किंग गुलीगत!" म्हणजेच, रितेश शो होस्ट करणार आहे, हे समजल्यावरच सूरजनं शोसाठी होकार दिला, असं त्यानं सांगितलं.
दरम्यान, मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यंदाच्या पर्वाची ट्रॉफी झापुक झुपुक फेम सूरज चव्हाणनं उंचावली. तर रनरअप ठरला इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत. बिग बॉस मराठीच्या सर्वच स्पर्धकांची जोरदार चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :