एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस'च्या घरात योगिताचा मास्टरस्ट्रोक, 'कोकणहार्टेड गर्ल' ठरली यंदाच्या सीझनची पहिली कॅप्टन

Bigg Boss Marathi Season 5 : 'कोकणहार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर ही बिग बॉसच्या घराची कॅप्टन झाली आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये शेवटच्या टप्प्यात योगिताने आपला कौल अंकिताच्या बाजूने दिला.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) यंदाच्या सीझनमधील घराला पहिला कॅप्टन मिळाला आहे. 'कोकणहार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर ही बिग बॉसच्या घराची कॅप्टन झाली आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये शेवटच्या टप्प्यात योगिताने आपला कौल अंकिताच्या बाजूने दिला. 'कॅप्टन्सी टास्क'च्या दरम्यान घरातील सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे दिसून आले. 

योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर आणि निखिल या आठवड्यात कॅप्टन होणार नाही, हे 'भाऊच्या धक्क्या'वर ठरले होते. घरचा कॅप्टन ठरवण्यासाठी बिग बॉसने सदस्यांसाठी  'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हा  टास्क ठेवला होता. या टास्क दरम्यान मोटरमनच्या केबिनमधील सीटवर जो बसेल तो कॅप्टन पदाचा उमेदवार ठरवणार असतो. मोटरमनसाठी दोन जागा असतात. त्याशिवाय, ट्रेनमध्ये हिरवी आणि लाल मार्गिका असे दोन भाग केले असतात. त्यामुळे बिग बॉसच्या आदेशानंतर ट्रेन कोणत्या मार्गिकेवर धावणार हे ठरते. त्या मार्गिकेवर जे स्पर्धक बसले आहेत, त्यांच्यातील एक सदस्य कॅप्टनपदासाठी पात्र ठरणार असतो.

कॅप्टनपदाचा उमेदवार ठरवण्याची महत्त्वाची जबाबदारी मोटरमनवर असल्याने ती खुर्ची पटकावण्यासाठी दोन्ही ग्रुपमध्ये जोरदार राडा होता. वैभव-सूरज,आर्या-जान्हवी यांच्यात वादावादी होते. संचालक असलेल्या वर्षा उसगांवकर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत अरबाज  संताप व्यक्त करतो. 

तिसऱ्या फेरीत बिग बॉस या टास्कमध्ये ट्वीस्ट आणत हिरवी मार्गिका बंद करतात. त्यामुळे केवळ निळ्या मार्गिकेसाठी लढत असते. हॉर्न वाजल्यानंतर वैभव आणि योगितामध्ये सीटवर बसण्यावरुन चढाओढ होते. दोघेही मोटरमनच्या सीटवर आपला दावा सांगतात. योगिता अक्षरश: रडते पण आपली जागा सोडत नाही. अखेर संचालिका वर्षा उसगांवकर या योगिताही मोटरमनच्या सीटवर बसली असल्याचे सांगतात. 
 
योगिता ज्या एका प्रवाशाला बुलेट ट्रेनमध्ये ठेवणार त्याचे नाव कॅप्टन म्हणून जाहीर होणार असते.  निक्की, वैभव, अभिजीत, अंकिता आणि पॅडी असे पाचही जण  आपण कॅप्टन पदासाठी योग्य का, याची कारणे सांगतात. मात्र, योगिता ही पॅडी, निक्की, अभिजीत, वैभव यांना बाद करते  आणि अंकिताला कॅप्टन म्हणून ठरवते. 

अंकिता कॅप्टन झाल्यावर डीपी अंकिताला थेट उचलून कॅप्टनच्या खोलीत नेतो. त्या ठिकाणी यंदाच्या सीझनमधील कॅप्टनसाठी अभिजित आणि इतर सदस्य गाणं गातात. यात निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव हा ग्रुप सहभागी झालेला नसतो.  

इतर संबंधित बातमी:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैदTop 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Embed widget