एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : रितेशच्या 'भाऊच्या धक्क्या'ने तोडले सर्व रेकॉर्ड्स, कलर्स मराठीच्या पोस्टने वेधलं लक्ष 

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने रचला इतिहास रचला असल्याची पोस्ट सध्या कलर्स मराठी वाहिनीकडून करण्यात आली आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 :  'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi New Season) नवं पर्व रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) होस्ट करणार असल्याची घोषणा झाल्यापासून चाहते नव्या सीझनबद्दल खूप उत्सुक होते. 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला. त्याची स्टाईल 'बिग बॉस'प्रेमींच्या चांगलीच पसंतीस उतरली. टीआरपी रेटिंगवर होत असल्याचं कलर्स मराठीकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टवरुन पाहायला मिळत आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील 'भाऊचा धक्का' रितेश देशमुख चांगलाच गाजवत आहे. 'भाऊच्या धक्क्या'वर सदस्यांची शाळा घेणं असो, आठवड्याभरातील सदस्यांच्या वागणुकीवर त्याने घेतलेली हजेरी असो किंवा आपल्या हटके स्टाईलने सदस्यांचं भरभरून केलेलं कौतुक असो...या साऱ्याच गोष्टी 'बिग बॉस मराठी'चा प्रेक्षकवर्ग वाढवण्यात कारणीभूत ठरत आहेत. एक भाऊचा धक्का संपल्यावर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर काय होणार याची 'बिग बॉस'च्या चाहत्यांसाठी असणारी उत्सुकता हेच या नव्या सीझनच्या यशाचं गुपित आहे. नव्या सीझनमधील नावीन्य आणि तरुणपण प्रेक्षकांना जास्त आकर्षित करत आहे.

भाऊच्या धक्क्याचा टीआरपी...

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने इतिहास रचला आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या या कार्यक्रमाच्या 'भाऊच्या धक्क्या'ने या आठवड्यात 3.2 TVR मिळवत टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. शाळा, कॉलेज, ट्रेन, भाजीमार्केट कुठेही जा सर्वत्र फक्त 'बिग बॉस मराठी' आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चर्चा होताना दिसत आहे. या नव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करत 2.4 TVR मिळवला आहे. वीकेंडचं सरासरी रेटिंग 2.8 TVR आहे. संपूर्ण महाराष्ट्राला 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचं वेड लागल्याचे हे पुरावे आहेत. 

'प्रेक्षकांचा सगळ्यात मोठा वाटा'

यावर रितेश देशमुखने प्रतिक्रिया देत म्हटलं की, "बिग बॉस मराठी'च्या यशामध्ये आपल्या प्रेक्षकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. रेटिंगचा चढता आलेख पाहणं खूपच सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. भाऊच्या धक्क्यासह सर्वच एपिसोडवर महाराष्ट्रभरातील प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे ऋणी आहोत. मला ही संधी दिल्याबद्दल कलर्स मराठी वाहिनीचे मी खूप आभारी आहे".

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

'आजही मला सचिनची बायको म्हणूनच...', जया 'अमिताभ' बच्चन वादंगानंतर सुप्रिया पिळगांवकरांचं वक्तव्य चर्चेत 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Badlapur Panvel Tunnel: आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
तुमच्या पोटातलं  ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटातलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 20 Sept 2024सकाळी ७ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 20 September 2024ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Badlapur Panvel Tunnel: आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
तुमच्या पोटातलं  ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटातलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Horoscope Today 20 September 2024 : आज पितृ पक्षाचा तिसरा दिवस; हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पितृ पक्षाचा तिसरा दिवस; हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज सुनफा योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
आज सुनफा योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Embed widget