Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant : 'बिग बॉस'च्या घरात राडा, अरबाज-जान्हवीला अभिजीत सावंत नडला!
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant : बिग बॉसच्या घरात दोन गट पडले असून नुकत्याच आलेल्या प्रोमोत त्या गटात देखील वाद बघायला मिळत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) घरात प्रत्येक दिवशी एक नवा वाद समोर येत आहे. नव्या सीझनमध्ये आता नवा ट्विस्ट घेतला आहे. पहिल्याच दिवसापासून शांत असलेल्या सूरजचेदेखील जान्हवीसोबत वाद झाला. त्यानंतर आता जान्हवी थेट अभिजीत सावंतलाही भिडली आहे. बिग बॉसच्या घरात दोन गट पडले असून नुकत्याच आलेल्या प्रोमोत त्या गटात देखील वाद बघायला मिळत आहे.
'बिग बॉस'च्या घरातील दुसऱ्या आठवड्यातील पहिला दिवसही वादाचा ठरणार असल्याची चिन्ह आहेत. रात्रीच्या वेळी घरातील दोन गटात वाद झाल्याचे दिसून आले आहे. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. या नव्या प्रोमोमध्ये पॅडी कांबळे आणि वैभव चव्हाण एकमेकांशी वाद घालताना दिसत आहे. त्याशिवाय, दुसऱ्या एका गटातील सदस्याच्या अंगावरील ब्लँकेट काढली जात आहे. तर, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत यांच्यात बाचाबाची, धक्काबुक्की झाल्याचे दिसून आले आहे. त्यावर अभिजीत सावंत हा मला तू मारलं असल्याचे सांगतो.
हा सगळा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे जान्हवी किल्लेकर देखील अभिजीत सावंतला भिडताना दिसत आहे. प्रोमोमध्ये जान्हवी ही एवढा नाजूक आहेस तर बिग बॉसच्या घरात का शिरला, असे तावातावाने विचारते. अभिजीत आणि जान्हवीने यांच्यात वादावादी होत असताना अभिजीत सावंत हा तिला प्रत्युत्तर देताना विचित्र पद्धतीने ओरडताना प्रोमोमध्ये दिसला आहे.
View this post on Instagram
घरात राडा का?
बिग बॉसच्या घरात दिवे बंद झाल्यानंतर कोणताही टास्क दिला जात नाही. सगळे सदस्य आपले स्ट्रॅटेजी ठरवतात अथवा झोपण्यासाठी जातात. नव्या प्रोमोत हा मोठा राडा झाल्याने याचे नेमकं कारण काय, बिग बॉसने टास्क दिला का? या टास्कमध्ये काही वाद झाले का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.