Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel : निक्की-अरबाजची जवळीक वाढली! इथे अरबाजच्या गर्लफ्रेंडचा मोठा निर्णय, म्हणाली...
Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel : अरबाजची कथित गर्लफ्रेंड लीझा बिंद्रा ही चर्चेत आली आहे. अरबाज आणि निक्कीबाबतच्या संबंधावर तिने याआधी पोस्ट केली होती. त्यानंतर आता, लीझाने आता मोठा निर्णय घेतला आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel : 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा (Bigg Boss Marathi Season 5) सीझन वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. घरातील सदस्यांमध्ये वादावादी, राडा होत आहे. तर, दुसरीकडे निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) यांच्यातील मैत्रीचीदेखील चर्चा सुरू असते. अरबाज पटेल आणि निक्कीमध्ये सूत जुळत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अरबाजची कथित गर्लफ्रेंड लीझा बिंद्रा (Leeza Bindra) ही चर्चेत आली आहे. अरबाज आणि निक्कीबाबतच्या संबंधावर तिने याआधी पोस्ट केली होती. त्यानंतर आता, लिझाने आता मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत आहे.
अरबाज आणि निक्कीत प्रेम फुलतं असल्याचे प्रेक्षकांना वाटत होते. निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीवर अरबाज पझेसिव्ह होत असे. मात्र, भाऊच्या धक्क्यावर पाहुण्यांसोबत रंगलेल्या खेळात अरबाजने आपण कमिटेड असल्याचे सांगितले होते. मात्र, अरबाजने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव सांगितले नव्हते. त्यानंतर अरबाजची गर्लफ्रेंड लीझा असल्याचे समोर आले होते.
लीझा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिने याआधी दोन वेळेस सोशल मीडियावर अरबाज-निक्कीबाबत भाष्य करणारी पोस्ट केली होती. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये तिने अरबाजचा उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली होती. स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला आहे, त्यावर तिने एक पोस्ट लिहित म्हटले की, “प्लीज मला अरबाजबद्दल मेसेज किंवा कमेंट करू नका”, असे म्हटले.
तर, तिने दुसरी एक पोस्ट शेअर केली होती. लीझाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटलं की, 'मला कुणाबद्दलही कोणती वाईट गोष्ट ऐकायला आवडत नाही. ती गोष्ट मग अरबाज आणि निक्कीबाबत असली तरीही मला ती ऐकायला आवडणार नाही. त्यामुळे जर माझ्याकडे कुणी आलं आणि कुणाबद्दल वाईट बोललं गेलं तर ते मी अजिबातच ऐकून घेणार नाही. त्याचप्रमाणे मी आधी जसं सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही. हे सगळं देवावर सोडून देऊया. काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, मला खरंच माहित नाही. त्यामुळे कुणालाही वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही, असे लीझाने आपल्या दुसऱ्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटले.
लीझाने घेतला मोठा निर्णय...
View this post on Instagram
लीझा बिंद्राने सोमवारी मोठा निर्णय घेतला. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित आपण, सोशल मीडिया काही काळासाठी सोडत असल्याचे सांगितले. लीझा या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून. नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “दुसऱ्यांमुळे स्वतःचे नुकसान करु नकोस” असे एका युजरने म्हटले. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “तू कोणत्या त्रासातून जात आहेस हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे प्लीज सोशल मीडिया सोडू नकोस”, तर, एकाने तू ''बिग बॉस मराठीमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून जा'', असा सल्लाही दिला आहे.