Bigg Boss Marathi : वर्षाताई घराबाहेर, आता अंकिताचा नंबर? सोशल मीडियावर जोरदार चर्चा; चाहते नाराज
Bigg Boss Marathi Finale Week : बिग बॉस मराठीमधून आणखी एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. या आठवड्यात आणखी एक मिड वीक एविक्शन होणार आहे.
Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीचा सध्या फिनाले वीक सुरु आहे. त्याआधी मिड वीक एविक्शनमध्ये वर्षा उसगांवकर घराबाहेर पडल्या आहेत. ग्रँड फिनाले आधी बिग बॉस आणखी एक धक्का देणार आहेत. बिग बॉस मराठीमधून आणखी एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. या आठवड्यात आणखी एक मिड वीक एविक्शन होणार आहे. अंकिता वालालवकर घराबाहेर पडणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली असून यामुळे चाहते नाराज असल्याचं दिसून येत आहे.
फिनाले आधी बिग बॉस देणार आणखी एक धक्का
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या विजेतेपदाच्या शर्यतीत सध्या सहा जण उरले आहेत, यामध्ये निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर यांचा सहभाग आहे. वर्षा उसगांवकर यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला, आता आणखी एका सदस्याला ग्रँड फिनाले आधीच बिग बॉसचं घर सोडावं लागणार असं बोललं जात आहे.
कोणत्या सदस्याचं स्वप्न भंगणार?
बिग बॉस मराठी पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळीला थेट फिनालेचं तिकीट मिळालं आहे, त्यामुळे ती थेट फिनालेमध्ये पोहोचली आहे. यानंतर आता अभिजीत, अंकिता, सूरज, धनंजय आणि जान्हवी यांच्यापैकी एक सदस्य घराबाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच अंकिता वालावलकर घराबाहेर पडणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यामुळे चाहते नाराज झाले आहेत.
वर्षाताई घराबाहेर, आता अंकिताचा नंबर?
मागील आठवड्यापासून अंकिताचे चाहते सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत. बिग बॉस विनाकारण अंकिताला टार्गेट करतंय, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. याशिवाय, गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात आलेले पाहुणे अभिजीत बिचुकले यांनी अंकिता, पॅडी आणि डीपीला टार्गेट केलं. आता पॅडी घराबाहेर पडला आहे. त्यानंतर आता अंकिताला बाहेर काढण्याचा प्लॅन आहे. सूरजची व्होटिंगही कमी दाखवण्याचा प्रयत्न असल्याचंही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
तुमच्या आवडत्या सदस्याला व्होट करा
बिग बॉस मराठीच्या घरातील तुमच्या आवडत्या सदस्यांना आजच JioCinema वर जाऊन वोट करा आणि त्यांना बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्यापासून वाचवा. वोटिंग लाइन्स शनिवार 5 ऑक्टोबर, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :