(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi 4 : तेजस्विनी लोणारीला सोडावं लागणार बिग बॉसचं घर; चाहते म्हणाले,"आमच्यासाठी तूच विजेती"
Bigg Boss Marathi 4 : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनी लोणारीला बिग बॉसचं घर सोडावं लागणार आहे.
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व सध्या विविध कारणाने चर्चेत आहे. एका टास्कदरम्यान तेजस्विनी लोणारीला (Tejaswini Lonari) दुखापत झाली आहे. त्यामुळे आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला घर सोडावं लागणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य भावूक झाले आहेत. तेजस्विनीला घर सोडावं लागणार असल्याने घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत. तेजस्विनीच्या हाताला दुखापत झाल्याने तिला घर सोडून जाणे अपिरिहार्य आहे, असं आढळून आलं आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"तेजस्विनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे घर आपल्याला आता या क्षणी सोडावे लागेल". बिग बॉसच्या या बोलण्यानंतर घरात सर्वत्र शांतता पसरली आहे. किरण माने, अपूर्वा, अमृता धोंगडे या सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
View this post on Instagram
तेजस्विनीला घर सोडावं लागणार यावर घरातील सदस्यांपैकी कोणाचा विश्वास बसत नव्हता. रहिवासी संघावर नेम प्लेट लावण्यावरुन तेजस्विनी आणि राखी सावंतमध्ये वाद झाला होता. पण आता बिग बॉसच्या सांगण्यावरून तेजस्विनीने जेव्हा तिच्या नावाची पाटी काढली तेव्हा राखी म्हणाली,"ही जागा तुझी आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
तेजस्विनी लोणारीचा मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉसच्या घरात 50 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनेदेखील तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या होत्या. तेजस्विनीला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार असल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत. हे खूपच धक्कादायक आहे, आमच्यासाठी तूच विजेती आहेस, बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची जान गेली, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या