एक्स्प्लोर
'बिग बॉस कपल' रोशेल-कीथ विवाहबंधनात
काही वर्षांच्या रिलेशनशीपनंतर मॉडेल रोशेल राव आणि अभिनेता कीथ सेक्वेरा यांनी अत्यंत गुप्तपणे लग्नगाठ बांधली.
मुंबई : 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये गाजलेली जोडी रोशेल राव आणि कीथ सेक्वेरा विवाहबंधनात अडकले आहेत. अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी आपल्या नात्याला एक नवं नाव दिलं. कीथ आणि रोशेलने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.
बिग बॉसच्या नवव्या पर्वात 2015 मध्ये रोशेल आणि कीथ सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात अनेक नाती जुळताना आतापर्यंत दिसली आहेत. मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडणारी जोडपी शोमधून गच्छंती होताच एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. रोशेल राव आणि कीथ मात्र याला अपवाद ठरले आहेत.
टीव्ही अँकर, मॉडेल रोशेल राव 2012 मध्ये 'फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल' किताबाची मानकरी ठरली होती. याशिवाय झलक दिखला जा (सहावे पर्व), फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी (पाचवे पर्व)मध्येही ती सहभागी झाली होती. 2014 मध्ये ती किंगफिशरच्या कॅलेंडरवरही झळकली होती.
अभिनेता कीथ सेक्वेराने मॉडेल, व्हीजे म्हणून काम केलं आहे. रेमंडच्या जाहिरातीतून कीथने नाव कमवलं. त्यानंतर बी4यू वाहिनीवर व्हीजे कीथ म्हणून त्याला लोकप्रियता मिळाली. स्टार प्लसवरील 'देखो मगर प्यार से' मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती. सिक्सटीन (2013) चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दिया और बाती हम, डोली अरमानोंकी सारख्या मालिकांत तो झळकला.
गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन्स डे च्या मुहूर्तावर कीथ आणि रोशेल यांनी एंगेजमेंट केली होती. काही वर्षांच्या रिलेशनशीपनंतर अत्यंत गुप्तपणे दोघांनी लग्नगाठ बांधली.
तामिळनाडूतील महाबलिपुरममध्ये शनिवारी दोघांनी लग्न केलं. रोशेल पांढऱ्याशुभ्र वेडिंग गाऊनमध्ये सुंदर दिसत होती, तर कीथने गुलाबी शर्ट आणि निळा सूट परिधान केला होता. 'बिग बॉस 9'मधले किश्वर मर्चंट आणि सुयश राय हे जोडपंही डिसेंबर 2016 मध्ये विवाहबंधनात अडकलं होतं. तर अभिनेत्री महक चहल आणि अभिनेता अश्मित पटेल येत्या ऑगस्टमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे.
❤️❤️ @rochellerao #KeRoGetsHitched Captured by - @shannonzirkle A post shared by Keith Sequeira (@keithsequeira) on
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement