Bigg Boss Marathi 3 : कोल्हापूरकर सोनाली पाटील बिग बॉसमधून बाहेर
Bigg Boss 3 : टिकटॉकस्टार सोनाली पाटीलने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे.
Bigg Boss 3 : कोल्हापूरकर सोनाली पाटीलने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे आणि सोनाली पाटील या सात जणांतून कोण बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. पण या सात जणांमधून आता अभिनेत्री आणि टिकटॉकस्टार सोनाली पाटील बाहेर पडली आहे.
View this post on Instagram
सोनालीच्या चाहत्यांसाठी हा अत्यंत धक्कादायक निर्णय आहे. टिकटॉकमुळे सोनालीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. वैजू नंबर वन या मालिकेद्वारे सोनालीने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. या मालिकेद्वारे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बिग बॉसच्या घरात सोनाली आणि मीनलची जोडी म्हणजेच सोना-मोनाची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात लवकरच ग्रँड फिनाले रंगणार आहे. 'बिग बॉस मराठी 3' च्या विजेत्याला वीस लाखांची रक्कम मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची ट्रॉफी कोणत्या स्पर्धकाकडे जाणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे या सहा स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनाले रंगणार आहे.
संबंधित बातम्या
Spider Man : बॉक्स ऑफिसवर 'स्पायडर मॅन'चा धुमाकूळ, 300 मिलियन डॉलरची केली कमाई
Sports movies : क्रिकेट चाहत्यांसाठी ट्रीट, बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणार बिग बजेट सिनेमे
Zareen Khan : मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याला जरीन खानचं समर्थन, प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांनाही सुनावलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha