एक्स्प्लोर

Munawar Faruqui: बिग बॉस-17 विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्याविरोधात एफआयआर दाखल; नेमकं प्रकरण काय?

Munawar Faruqui: मुनव्वरच्या एका चाहत्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

FIR against Munawar Faruqui Fan: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss-17) या कार्यक्रमाचा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा ठरला. मुनव्वर हा बिग बॉसची ट्रॉफी घेऊन डोंगरीमध्ये गेला होता.   डोंगरीमधील मुनव्वरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  आता मुनव्वरच्या एका चाहत्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  मुनव्वर फारुकीच्या रोड शोदरम्यान त्याच्या एका चाहत्याने बेकायदेशीरपणे ड्रोनचा वापर केला. परवानगीशिवाय रोड शोमध्ये ड्रोन कॅमेरा आणल्याप्रकरणी मुनव्वरच्या चाहत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मुनव्वरच्या चाहत्याविरुद्ध एफआयआर दाखल

मुनव्वर फारुकीच्या चाहत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी मुनव्वरचा चाहता अरबाज युसूफ खानच्या नावावर एफआयआर नोंदवला आहे. मुंबई पोलीस हवालदार नितीन शिंदे यांनी पीएसआय तौसिफ मुल्ला यांच्यासह ड्रोनवर नजर ठेवली होती. यानंतर पोलिसांनी ड्रोन ऑपरेटरचा शोध घेतला. पोलिस तपासात अरबाज युसूफ खानचे नाव पुढे आले आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करता येत नाही. ड्रोन वापरण्यासाठी पोलिसांची आधी परवानगी घ्यावी लागते. याशिवाय उपायुक्तांच्या परवानगीनंतरच ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करता येतो. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)

बिग बॉस 17 चा फिनाले 28 जानेवारी पार पडला. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉसचे विजेतेपद जिंकल्यानंतर मुनव्वर ट्रॉफी घेऊन डोंगरी येथे गेला होते. डोंगरी येथे मुनव्वरच्या चाहत्यांनी त्यांच्या गाडीला चारही बाजूंनी घेरलं होतं. त्याचवेळी मुनव्वरही त्याच्या चाहत्यांना पाहून खूप खुश दिसत होता. याआधी मुनवर फारुकी यांनी लॉक-अप हा रिॲलिटी शोही जिंकला आहे.

मुनव्वरला मिळाले 50 लाख अन् ट्रॉफी

मुनव्वरला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच 50 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहे. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे. 28 जानेवारीला मुनव्वरचा वाढदिवस होता.  मुनव्वर फारुकीला वाढदिवशी चाहत्यांनी मोठं गिफ्ट मिळालं. त्याला बिग बॉस 17 या कार्यक्रमाची ट्रॉफी सलमान खानच्या हस्ते मिळाली.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

VIDEO: 'बिग बॉस' जिंकल्यानंतर ट्रॉफी घेऊन डोंगरीमध्ये पोहचला मुनव्वर फारुकी; नेटकरी म्हणाले,"डोंगरी का शेर"

 

महत्त्वाच्या बातम्या

AaiTuljha Bhavani: 'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget