Salman Khan: "मी तुम्हाला जन्म दिलेला नाही, तुमच्या मुर्खपणात मला इंटरेस्ट नाही!"; सलमान खानची का 'सटकली'?
Bigg Boss 17: नुकताच 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस 17'चा सूत्रसंचालक सलमान खान (Salman Khan) हा घरातील सदस्यांवर भडकलेला दिसत आहे.
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या शोमध्ये रोज नवे ट्विस्ट येत आहेत. बिग बॉसमधील स्पर्धकांमध्ये वाद सुरु आहेत. अशातच नुकताच 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस 17'चा सूत्रसंचालक सलमान खान (Salman Khan) हा घरातील सदस्यांवर भडकलेला दिसत आहे.
बिग बॉसमधील स्पर्धकांवर भडकला सलमान
सोशल मीडियावर 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाच्या वीकेंड का वारचा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये भाईजान बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांवर रागावलेला दिसत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, सलमान बिग बॉसमधील स्पर्धकांना म्हणतो, "या घरात माझ्याबद्दल गैरसमज करणारे बरेच लोक आहेत. मला काही फरक पडत नाही. मी कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण देत नाही आणि मला येथे ज्ञान देण्यात आणि समजावून सांगण्यात काहीच रस नाही. मी तुम्हाला जन्म दिला नाही, तुम्ही माझी मुलं नाहीत. तुमच्या मुर्खपणात मला इंटरेस्ट नाही"
बिग बॉसचा हा प्रोमो पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जाऊ शकतो की, अनुरागच्या तक्रारीमुळे सलमान संतापला आहे. अनुरागने बिग बॉसकडे सलमानबद्दल तक्रार केली होती की तो वारंवार त्याच्या ब्रोसेनाचा उल्लेख करून त्याची खिल्ली उडवतो. आता सलमानच्या रागाचे नेमके कारण काय आहे? हे बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये कळेल.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात अंकिताची प्रेग्नन्सी टेस्ट
अंकिता लोखंडेचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता विकीला सांगते, "सध्या मी खूप कन्फ्यूज आहे. माझी प्रेग्नंसी टेस्ट देखील झाली आहे. प्रेग्नंसी टेस्टसह ब्लड टेस्ट आणि यूरिन प्रेग्नंसी टेस्टदेखील झाली आहे. मला पाळीदेखील आलेली नाही. मी खरचं प्रेग्नंट आहे की नाही हे मला माहिती नाही. पण आता मला घरी जायचं आहे".
'बिग बॉस 17' मध्ये दोन लग्न झालेल्या कपलनं सहभाग घेतला आहे. नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा आणि अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडप्यांनी 'बिग बॉस 17' मध्ये भाग घेतला आहे.
संबंधित बातम्या: