Bigg Boss 17 House: 'बिग बॉस-17' च्या घराची पहिली झलक समोर; यंदाच्या सीझनची असणार खास थीम
Bigg Boss 17 House: बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या सेटचा क व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Bigg Boss 17 House: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा (Bigg Boss 17) नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सलमान खानचा हा शो 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये या शोबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. आता बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या सेटचा म्हणजेच बिग बॉसच्या घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या सेटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, बिग बॉसच्या घराच्या आतील बाजूची एक झलक दिसत आहे. बिग बॉस-17 च्या घराचा सेट तयार केला जात आहे. यावेळी बिग बॉसचे घर खूपच आलिशान असणार आहे, असा अंदाज हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी लावत आहे. बिग बॉसच्या घराची थीम दरवर्षी बदलत असते.
"बिग बॉस-17" ची थीम
बिग बॉसचा हा सीझन खूपच मजेशीर असणार आहे. कारण यंदाची थीम ही कपल विरुद्ध सिंगल अशी असणार आहे. काही कपल्स आणि काही सिंगल स्पर्धक बिग बॉस-17 या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
या कलाकारांच्या नावांची चर्चा
बिग बॉसच्या 17 व्या सीझनमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सहभागी होणार आहेत, असं म्हटलं जात आहे. याशिवाय मुनावर फारूक, शीझान कान, अरमान मलिक, ईशा मालवीय आणि श्रीमान फैझू हे कलाकार देखील बिग बॉसमध्ये सहभाग घेणार आहेत. पण या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी अजून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
बिग बॉस 17 या शोची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रोमोमध्ये सलमान विविध लूक्समध्ये दिसला. प्रोमोमधील सलमानच्या लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले. सलमान हा बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो.
महत्वाच्या इतर बातम्या :
Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदरला 'बिग बॉस 17' ची ऑफर, VIDEO शेअर करत दिली माहिती