Bigg Boss 17 Grand Finale: मुनव्वर फारुकी ठरला 'बिग बॉस-17' चा विजेता
Bigg Boss 17 Grand Finale Live Updates: बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार? तसेच हा ग्रँड फिनाले प्रेक्षक कुठे पाहू शकणार आहेत? या सर्व गोष्टी जाणून घेऊयात...
Bigg Boss 17 : मनारा चोप्रा बिग बॉस-17 मधून आऊट झाली आहे. आता मुनव्वर आणि अभिषेकमध्ये ट्रॉफीसाठी चुरशीची लढत होणार आहे.
Bigg Boss 17: बिग बॉसच्या मंचावर तिन्ही खान आले एकत्र आले आहेत. अरबाज खान, सोहेल खान आणि सलमान खान यांनी बिग बॉस-17 च्या ग्रँड फिनालेमध्ये हजेरी लावली. यावेळी 'मुन्ना बदनाम हुआ' या गाण्यावर या तिघांनी डान्स केला.
Bigg Boss 17 Grand Finale : बिग बॉसच्या 17 च्या घरातून अंकिता लोखंडे बाहेर पडली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अंकिता बाहेर पडल्यामुळे आता बिग बॉसच्या घरात मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नार चोप्रा हे 3 स्पर्धक उरले आहेत. त्यातीलच एक बिग बॉस 17 विजेता ठरणार आहे.
Bigg Boss 17 Grand Finale : बिग बॉसच्या 17 च्या घरातून अंकिता लोखंडे बाहेर पडली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता बिग बॉसच्या घरात 3 स्पर्धक उरले आहेत. त्यातीलच एक बिग बॉस 17 विजेता ठरणार आहे.
Bigg Boss 17 : बिग बॉस 17 मध्ये एमसी स्टॅनची देखील एंट्री झाली आहे. एमसी स्टॅन बिग बॉस 16 चा विजेता ठरला होता.
Big Boss 17 : बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेमध्ये एलिमिनेशन झाले असून अरुण महाशेट्टी स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Bigg Boss : ग्रँड फायनलच्या पहिल्या एलिमिनेशनसाठी बिग बॉसच्या घरात सध्या शैतान दाखल झाला आहे. यावेळी स्पर्धक आणि अजय देवगण आणि आर माधवन यांच्यामध्ये संवाद सुरु आहे.
Bigg Boss 17 : बिग बॉस 17 च्या संपूर्ण सिझनमध्ये विकी आणि अंकता लोखंडे भांडताना दिसले. मात्र, ग्रँड फिनालेमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे. संपूर्ण सिझनमध्ये भांडणारे विकी आणि अंकिता “कभी खुशी कभी गम” या गाण्यावर थिरकताना दिसले आहेत. विकी आणि अंकिताच्या परफॉर्मन्सने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.
Big Boss : बिग बॉसच्या 17 च्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खान सध्या स्पर्धकांच्या कुटुंबाशी बोलताना दिसत आहे. त्याने अभिषेकच्या आईला विचारले की, "तुम्हाला कशी सून पाहिजे?"
Big Boss 17 : बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेमध्ये 5 टॉप स्पर्धकांच्या कुटुंबीयांची एंट्री झाली आहे. “तू खूप छान खेळली”, असे अंकिता लोखंडेची आई म्हणाली आहे.
Bigg Boss : बिग बॉसने दाखवली ट्रॉफीची झलक दाखवली आहे. शिवाय, स्पर्धकांचा बिग बॉसमधील प्रवास कसा होता? हेही दाखवण्यात आले आहे.
Bigg Boss 17 : बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेमध्ये सध्या कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरी बोलताना दिसत आहेत. दरम्यान सुदेश लहरी यांनी अंकिता लोखंडे यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. "विनर तर अंकिताच होईल", अशी भविष्यवाणी सुदेश लहरी यांनी केली आहे.
Bigg Boss 17 : कृष्णा अभिषेकची बिग बॉसच्या 17 च्या फिनालेमध्ये धर्मेंद्रच्या स्टाईलने एन्ट्री केली आहे. तो बिग बॉस 17 च्या स्पर्धकांशी गप्पा मारताना दिसतोय. अभिषेकसोबत भारती सिंगही दिसत आहे. दोघेही फिनालेमध्ये धमाल करताना दिसत आहेत.
Bigg Boss 17: अंकिता, चिंटू आणि नीलला ओरीसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. या तिघांचा रॅम्प वॉक ओरीला आवडला.
Bigg Boss 17 : अरुण आणि सनी यांना बेस्ट जोडीचा अवार्ड मिळालाय. कृष्णा-अभिषेकच्या जोडीने बिग बॉसच्या सेटवर येत अवॉर्ड जाहिर केले. त्यांनी या अवार्ड्सचे वाटप केले आहे.
Bigg Boss 17: ओरीनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. ओरीनं अतरंगी लूकमध्ये बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. आता स्पर्धक ओरीच्या समोर रॅम्प वॉक करत आहेत.
Bigg Boss 17: बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. अशताच घरातील लोकांचे मनोरंजन करण्यासाठी भारती सिंह आणि कृष्णा अभिषेकनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.
Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' च्या ग्रँड फिनाले सोहळ्याला सुरुवात झाली आहे. महाअंतिम सोहळ्यासाठी घरातील सर्व स्पर्धकांनी खास लूक केला आहे.
बिग बॉसचा महाअंतिम सोहळा रविवारी (दि.28) पार पडणार आहे. कलर्स टिव्ही आणि जिओ सिनेमावर सांयकाळी 6 ते 12 या वेळेत प्रेक्षकांना हा सोहळा पाहाता येणार आहे. मुनव्वर फारुकी, मन्नार चोप्रा, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी यांपैकी कोण 17 व्या सिझनचा विजेता ठरणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, सोशल मीडियावर याबाबत वोटिंग ट्रेंडमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चाहते ही हैराण झाले आहेत.
Big Boss 17 : बिग बॉस सिझन 17 चा महाविजेता आज घोषित केला जाणार आहे. या सिझनच्या जेतेपदासाठी 5 स्पर्धकांमध्ये सामना रंगणार आहे. मुन्नवर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी या 5 जणांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
Big Boss : अभिनेता सलमान खानचा रिआलिटी शो 'बिग बॉस 17' चा विजेता आज घोषित होणार आहे. काही तासांत बिग बॉसला नवा विजेता मिळेल. बिग बॉसच्या 17 व्या सिझनच्या अंतिम फेरीत अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यामध्ये सामना असणार आहे. या पाच जणांपैकी एक बिग बॉसच्या 17 व्या सीझनचा विजेता ठरेल. मात्र, यापूर्वीच्या 16 सिझनमध्ये कोणी कोणी बिग बॉसचा खिताब पटकावलाय जाणून घेऊयात...
Bigg Boss 17: बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमध्ये अंकिता आणि विकीचा रोमँटिक डान्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नुकताच बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये विकी आणि अंकिता यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे.
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या प्रसिद्ध कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले आज होणार आहे. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), मुनावर फारुकी (Munawar Faruqui), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) , मन्नारा चोप्रा (Mannara chopra) आणि अरुण महाशेट्टी (Arun Mashetty) हे या कार्यक्रमाचे टॉप 5 स्पर्धक आहेत. आज बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. पण त्या आधी बिग बॉस 17 या कार्यक्रमामधील अशा कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल जाणून घेऊयात, ज्याची चर्चा सोशल मीडियावर झाली.
Bigg Boss 17: बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 28 जानेवारी रोजी जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे.
पार्श्वभूमी
Bigg Boss 17 Grand Finale Live Updates: छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असणाऱ्या बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले आज (28 जानेवारी) पार पडणार आहे. आता या स्पर्धेतील टॉप-5 स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरणार? हे आता लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेशी संबंधित प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार? तसेच हा ग्रँड फिनाले प्रेक्षक कुठे पाहू शकणार आहेत? या सर्व गोष्टी जाणून घेऊयात...
'बिग बॉस 17' चे टॉप-5 स्पर्धक (Bigg Boss 17 Top 5 Contestants)
अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण मशेट्टी या टॉप-5 स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोणार? याकडे सध्या अनेकांचे लक्ष लागले आहे. बिग बॉस 17 कार्यक्रमातील स्पर्धकांसाठी सध्या प्रेक्षक वोट करत आहेत.
बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहू शकता?
बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 28 जानेवारी रोजी जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे. हा रिॲलिटी शो संध्याकाळी सहा वाजता सुरु होणार असून तो रात्री 12 वाजेपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विजेत्याला काय-काय मिळणार?
बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या विजेत्याला बक्षीस म्हणून 30-40 लाख रुपये मिळणार आहेत, असं म्हटलं जात आहे. तसेच विजेत्याला ट्रॉफीशिवाय कारही मिळेल.
ग्रँड फिनालेला सेलिब्रिटी लावणार हजेरी
ओरी, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, अब्दू हे सेलिब्रिटी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये हजेरी लावणार आहेत.
बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यात मतभेद झालेले पहायला मिळाले. आता अंकिता ही बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचली आहे.
ऐश्वर्या शर्मा,नील भट्ट,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. बिग बॉस-17 चे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. आता बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -