Bigg Boss 15 Grand Premiere : "बिग बॉस 15" आजपासून येतोय भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता
आजपासून "बिग बॉस 15" कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे.
Bigg Boss 15 Grand Premiere : बिग बॉस हा सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या रिअलिटी शो मधील एक आहे. मागील काही वर्षांत या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या प्रत्येकाचे आयुष्य बदलून जात असते. आजपासून या कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. या शोचे सूत्रसंचालन करताना सलमान खान दिसून येणार आहे.
"बिग बॉस"चे चाहते गेले अनेक दिवस हा कार्यक्रम सुरू होण्याची वाट बघत होते. त्या सर्व चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, आज "बिग बॉस 15" चा ग्रॅंड प्रीमिअर होणार आहे. याआधी बिग बॉसच्या पहिल्या लाइव्ह-स्ट्रीमिंगचे नाव बिग बॉस ओटीटी ठेवण्यात आले होते. बिग बॉसच्या या पर्वात प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट, शमिता शेट्टी,तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, अक्शा सिंह, डोनल बिष्ट, उमर रियाज, सिंबा नागपाल, साहिल श्रॉफ, निशा अय्यर, विशाल कोटियन आणि विधि पंड्या हे स्पर्धक सहभागी होणार आहेत.
जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता?
आजपासून रात्री 9:30 वाजता "बिग बॉस 15"चा प्रीमिअर कलर्स चॅनलवर प्रसारित होणार आहे. तसेच "बिग बॉस 15" वूट अॅपवरदेखील उपलब्ध होणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 10:30 वाजता हा बहुचर्चित कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
बिग बॉसची यंदाची थीम असणार जंगल
सलमान खानचा "बिग बॉस 15" 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यंदाची बिग बॉसची थीम जंगल आहे. त्यामुळे स्पर्धकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक येत्या एक-दोन दिवसांत घरात प्रवेश करतील. यंदाचे पर्व मागील पर्वांपेक्षा जरा वेगळे असणार आहे. कार्यक्रमाची निर्मात्यांनी देखीलपूर्णपणे तयारी केली आहे.
मराठी बिग बॉस मध्ये महेश मांजरेकर घेणार स्पर्धकांची शाळा
बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू झाल्यापासून त्यातील स्पर्धक प्रचंड चर्चेत आहेत. कधी एकमेकांवर आरडाओरडा करतात, तर कधी भरभरून प्रेम करताना हे स्पर्धक नेहमीच दिसून येत असतात. येत्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन नसणार आहे. त्यामुळे
स्पर्धक काय घोळ घालणार हे येणाऱ्या भागात दिसून येणार आहे.