(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात कोरोनाचा शिरकाव, अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण?
Bigg Boss 15 Latest Update : बिग बॉसच्या घरात नुकताच वाइल्ड कार्ड एन्ट्री केलेल्या अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Bigg Boss 15 Wild Card Entry : 'बिग बॉस 15' मध्ये लवकरच धमाल पाहायला मिळणार आहे. बिग बॉसमध्ये लवकरच राखी सावंतची (Rakhi Sawant) वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. रश्मि देसाई आणि देवोलीना भट्टाचार्जीची वाइल्ड कार्ड एन्ट्री लांबणीवर गेली आहे. त्यामुळेच निर्मात्यांनी राखी सावंतला बिग बॉसमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राखीने याआधी 'बिग बॉस 14' मध्ये धमाकेदार कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली होती. बिग बॉसच्या घरात आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण झाली आहे.
"आय अॅम अ आर्टिस्ट, आय अॅम अ रायटर, आय अॅम अ पोएट, आय अॅम अ सिंगर, आय अॅम अ कम्पोझिशन मेकर, आय वाँट टू बी अ बिकम...",असं म्हणत अभिजीत बिचुकलेने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. 'बिग बॉस 15' मध्ये आता पुन्हा एकदा राखी सावंतचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळेच बिग बॉसच्या कोविड प्रोटोकॉलनुसार दोघांच्या प्रवेशाला उशीर होऊ शकतो. देवोलीना आणि रश्मीसोबत राखी सावंतलादेखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान बिग बॉस मराठीचा स्पर्धक अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो सोमवारी घरात जाणार होता पण कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या प्रवेशाला विलंब होऊ शकतो,असे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
प्रेक्षकांचे मनोरंजन थांबू नये म्हणून राखी सावंतला 'बिग बॉस 15' मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून पाठवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. राखीच्या आगमनाने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना चांगलाच धक्का बसणार आहे. राखीच्या आगमनामुळे घरातील सदस्यांसोबत प्रेक्षकांचेदेखील मनोरंजन होणार आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकलेचा 'जलवा' आता हिंदी 'बिग बॉस'मध्ये, वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर सलमानही चक्रावला
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात टास्कदरम्यान सदस्यांमध्ये पडणार वादाची ठिणगी
Antim : सलमान खानला पुणेकरांच्या प्रेमाची मोजावी लागली मोठी किंमत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha