एक्स्प्लोर
Bigg Boss 12 : एका टास्कमुळे अनुप-जसलीन यांचं ब्रेकअप!
परंतु जसलीन असं काहीही करण्यास तयार नसते. यामुळे नाराज अनुप जलोटा तिच्या प्राध्यान्यांवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.

मुंबई : 'बिग बॉस 12' मध्ये 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथारुसोबत एन्ट्री केलेल्या 65 वर्षीय अनुप जलोटा यांनी आता तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. होय, बिग बॉसमधील सर्वात लोकप्रिय जोडी या आठवड्यात वेगळी होणार आहे. खुद्द अनुप जलोटा एका व्हिडीओत याचा खुलासा करताना दिसत आहेत.
खरंतर दोघांमध्ये ब्रेकअपची सुरुवात या आठवड्यात घरातील सदस्यांनी दिलेल्या नॉमिनेशन टास्कने झाली. या टास्कमध्ये सिंगल सदस्यांना जोडीपैकी एकाचं अपहरण करायचं होतं. त्याला सोडण्यासाठी अपहरणकर्ते कोणतीही अट ठेवू शकत होते. त्यांच्या मागण्या पूर्ण करुन आपल्या जोडीदाराला वाचवू शकतो किंवा मागण्या पूर्ण न झाल्याने सिंगल सदस्य पुढच्या नॉमिनेशनपासून सुरक्षित होऊ शकतो.
Bigg Boss 12 : अनुप जलोटा, नेहा पेंडसे, श्रीशांतची एन्ट्री
या टास्कमध्ये अपहरणकर्ते बनलेल्या दीपिका आणि नेहा, अनुप-जसलीनच्या जोडीपैकी अनुप जलोटा यांचं अपहरण करतात. त्यांना सोडवण्यासाठी जसलीनसमोर कपडे, मेकअपचं साहित्य आणि केस कापण्याची मागणी करतात. परंतु जसलीन असं काहीही करण्यास तयार नसते. यामुळे नाराज अनुप जलोटा तिच्या प्राध्यान्यांवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. अनुप माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, पण कपडे आणि मेकअपही तेवढेच खास असल्याचं जसलीन व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
https://twitter.com/ColorsTV/status/1046633394514288640?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1046633394514288640&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Ftv%2Fbigg-boss%2Fanup-jalota-admitted-that-there-was-no-point-continuing-relationship-with-jasleen-matharu%2Farticleshow%2F66037080.cms
जसलीनच्या या वर्तनावर अनुप जलोटा नाराज दिसत आहेत. "या शोमध्ये मी जसलीनच्या हट्टामुळे आलो. जर तिला कपडे आणि मेकअप साहित्याचा मोह सोडता येत नाही, तर हे नातं आणखी पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही. आता मी एकटाच आहे आणि ही जोडी तोडत आहे," असं अनुप जलोटा बोलताना दिसत आहेत. "अशाप्रकारच्या टास्कमध्ये माणुसकीचा शोध लागतो. जर हा टास्क मला दिला असता, तर मी माझे सगळे कपडे आणून ठेवले असते. टास्कमध्ये कपडेच द्यायचे होते, जीव तर नाही. मी निर्णयावर ठाम असून तो आता कोणीही बदलू शकत नाही," असंही ते म्हणाले.
त्यामुळे अनुप जलोटा आणि जसलीन मथारु यांचं खरंच ब्रेकअप होणार आहे की हा स्क्रिप्टचा एक भाग आहे, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.Kya @anupjalota aur #JasleenMatharu ki ye anokhi kahaani reh jayegi adhuri? Kya #BB12 ke ghar mein toot jayenge yeh do dil? Janne ke liye dekhte rahiye #BiggBoss12. pic.twitter.com/Fl0maQTbUX
— COLORS (@ColorsTV) October 1, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
