Bhaucha Dhakka : 'तुमची ही नाटकं माझ्यासमोर चालणार नाही', छोटा पुढारीला रितेश भाऊची चपराक
Bhaucha Dhakka : छोटा पुढारी म्हणजे घन:श्यामच्या खेळावर रितेश देशमुखने तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळालं आहे.
Bhaucha Dhakka : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) चौथ्या आठवड्यात रितेशने सगळ्यांचीच शाळा घेतली. त्याचप्रमाणे घरातील स्पर्धकांना काही टास्क देखील दिले. मैत्री वैगरे सगळं बाजूला ठेवून स्पर्धकांनी ते टास्क पूर्णही केले. पण एका स्पर्धकाच्या टास्कवर रितेशने पूर्णपणे नाराजी व्यक्त केली. घन:श्यामचा खेळ चौथ्या आठवड्यात कुणालाही दिसला नाही. त्यावरूनही रितेशने त्याला खडेबोल सुनावले.
रितेशने खास घन:श्यामसाठी एक टास्क दिला. काही बॅच दिले ज्यावर काही शब्द होते, घरात तसं कोण वागतं ते पाहून ते बॅच त्या व्यक्तीला घन:श्यामला द्यायचे होते. पण घन:श्यामने हा टास्क पूर्ण केला नाही आणि रितेश भाऊ त्याच्यावर चांगलेच चिडेल. जर टास्क पूर्ण केला नाही तर घराबाहेर काढेन असा दमही रितेश भाऊंनी दिला. पण तरीही त्याने टास्क पूर्ण केला नाही.
घन:श्यामने सगळ्यांना दिले लेबल
घन:श्यामने सुरुवातीला माचीस हे लेबल डीपी म्हणजे धनंजयला दिलं. त्यानंतर साप हे लेबल पॅडीला दिलं. पण त्यावेळी त्याने दिलेली कारणं कुणालाही पटली नाहीत. रितेशलाही ती कारण पटली नाहीत. पुढे त्याने पाठित खंजीर खुपसते म्हणून अंकिताला ते लेबल दिलं. त्याचंही कारण घरात कुणाला पटलं नाही. त्यानंतर चावीचं माकडं असं ते लेबल होतं. भाऊच्या धक्क्यावरच रितेशने निक्कीला चावीचं माकडं म्हटलं होतं. पण घन:श्यामने ते लेबल कुणालाही दिलं नाही, म्हणून रितेश भाऊ घन:श्यामवर चिडले.
'तुमचा टास्क, गेम इथेच संपला'
घन:श्यामने जेव्हा टास्क पूर्ण केला नाही, तेव्हा रितेश त्याला म्हणाला की, जर तुम्ही ते चिन्ह कुणालाही दिलं नाही तर तुम्हाला घराबाहेर जावं लागेल. आज माझा मूडही खराब आहे. एकाला मी जेलमध्ये टाकलंय, एकाला मी नॉमिनेट करणार आहे, तुमच्यासोबत काय करेन माहित नाही. तरीही घन:श्यामने तो टास्क पूर्ण केला नाही. पुढे रितेशने म्हटलं की, संपला टास्क बसा खाली. त्यावर घन:श्यामने रितेशची माफी मागितली.
पुढे रितेशने म्हटलं की, एकतर तुम्ही खेळात दिसत नाही, म्हणून तुमच्यासाठी स्पेशल टास्क ठेवलाय. तोही पूर्ण केला नाही. आता तुमच्याशी मी बोलणार नाही. पण इथून पुढे माझ्याकडून काही अपेक्षा ठेवायच्या नाहीत. तुमचा टास्क, गेम इथेच संपला. तुमची नाटकं माझ्यापुढे चालणार नाही.