Deepesh Bhan Passes Away : क्रिकेट खेळताना मृत्यूने गाठलं, 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेता दीपेश भान यांचे निधन
Deepesh Bhan : ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत ‘मलखान’ची भूमिका साकारणारे अभिनेते दीपेश भान यांचे निधन झाले आहे.
Deepesh Bhan : ‘भाभी जी घर पर हैं’ (Bhabi ji Ghar Par Hai ) या मालिकेत ‘मलखान’ची भूमिका साकारणारे अभिनेते दीपेश भान (Deepesh Bhan) यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपेश क्रिकेट खेळत होते आणि अचानक बेशुद्ध होऊन पडले. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सोशल मीडियावर ‘मलखान’च्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता दीपेश भान यांच्या निधनाने अवघ्या टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे.
अभिनेता दीपेश भान याने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘एफआयआर’ मालिकेतील दीपेशची सहकलाकार आणि अभिनेत्री कविता कौशिकनेही (Kavita Kaushik) सोशल मीडियावर पोस्ट लिहित अभिनेत्याच्या निधनाची पुष्टी केली आहे. कविताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘दीपेश भानच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड धक्का बसला आहे. ते एफआयआर शोचे महत्त्वाचे सदस्य होते. ते खूप निरोगी होते. त्यांनी कधीही दारू किंवा सिगारेटला हात लावला नाही. दीपेश आपल्या एका वर्षाच्या लहान मुलाला, पत्नीला आणि कुटुंबाला सोडून निघून गेला आहे.’
पाहा पोस्ट :
‘या’ मालिकांमध्ये केलेय काम
अभिनेता दीपेश भान सध्या ‘भाभी जी घर पर’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते. यापूर्वी त्यांनी 'कॉमेडी का किंग कौन', 'कॉमेडी क्लब', 'भूतवाला', 'एफआयआर'सह 'चॅम्प' आणि 'सुन यार चिल मार' सारख्या शोमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटामध्ये आणि काही जाहिरातींमध्येही कामे केली होती.
‘तिवारीजींनाही बसलाय धक्का
‘भाभीजी घर पर है’ या शोमध्ये ‘तिवारीजीं’ची भूमिका करणारे अभिनेते रोहितेश गौर यांना देखील दीपेशच्या निधनाने धक्का बसला आहे. या घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘आज आमच्या कॉल टाइमला थोडा उशीर झाला, त्यामुळे मला वाटतं जिमनंतर तो क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेला होता. हा त्याच्या फिटनेस रूटीनचा एक भाग होता. पण, क्रिकेट खेळताना तो अचानक पडला आणि ही घटना घडली. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे.’
हेही वाचा :
वडील प्रसिद्ध अभिनेते असतानाही मुलाने केली होती फॅक्टरीत नोकरी! वाचा अभिनेता सूर्याबद्दल...