Autograph: 'प्रेम एकवेळ संपेल पण नातं...' अंकुश आणि अमृताचा रोमान्स, ऑटोग्राफचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 'या' दिवशी होणार
अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याच्या ‘ऑटोग्राफ’ (Autograph) या चित्रपटाचा लवकरच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
Autograph: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अंकुशच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याच्या ‘ऑटोग्राफ’ (Autograph) या चित्रपटाचा लवकरच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरला कॅप्शन देण्यात आलं, 'प्रेमापेक्षा नातं महत्वाचं...कारण प्रेम एकवेळ संपेल पण नातं... ते कायमच असतं.... ऑटोग्राफ, एका जपून ठेवाव्याश्या लवस्टोरीचा ट्रेलर खास तुम्हा रसिक प्रेक्षकांसाठी. थिएटर किंवा ओटीटीच्या अगोदर थेट Star प्रवाह वर... नक्की पहा ‘ऑटोग्राफ’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर.' रविवार 14 मे दुपारी 1 वा. Star प्रवाह वर ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.'
View this post on Instagram
सतीश राजवाडे यांनी ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं, “या चित्रपटामध्ये आपल्या प्रियजनांना एकत्र आणण्याची ताकद आहे. आपल्या आयुष्यात ज्यांचा अविभाज्य सहभाग होता त्यांची आठवण चित्रपट करून देतो. हा चित्रपट अशा व्यक्तींबद्दल आहे की ज्यांनी आपल्या आयुष्याला वळण दिले आहे आणि एखाद्या ‘ऑटोग्राफ’प्रमाणे आपल्या आयुष्यावर अनोखी अशी छाप पडली आहे. आपल्या प्रत्येकाची स्वतःची अशी एक प्रेमकथा असते आणि त्यातील काही या अव्यक्त असतात तर काही छुप्या असतात. मनाच्या कोपऱ्यात खोलवर त्यांना स्थान असते, आणि त्या आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात. ‘ऑटोग्राफ’ आपल्याला या सर्व प्रिय क्षणांची आठवण करून देईल. चित्रपटात आनंदाचे अनेक क्षण आणि दुःखाची झालर असलेल्या अनिवार्य अशा क्षणांची आठवण करून देतो. पण सरतेशेवटी, ही हृदयाला भिडणारी एक कथा असून आपल्यातील प्रत्येकजण ती आयुष्यभर जपून ठेवेल अशी आहे.”
दिग्दर्शक सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अंकुश चौधरीसह अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे आणि मानसी मोघे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘ऑटोग्राफ’ च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अंकुशचे आगामी चित्रपट
अंकुश हा महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अंकुशनं या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :