Suraj Chavan : 'हा खरा मराठी मातीतला काटक, कसलेला मावळा'; मराठी अभिनेत्याने थोपटली सूरजची पाठ
Suraj Chavan : सूरजच्या बिग बॉसच्या घरातील खेळावर सध्या एका मराठी अभिनेत्याची पोस्ट बरीच चर्चेत आली आहे.

Suraj Chavan : बिग बॉसच्या घरातलं (Bigg Boss Marathi Season 5) एक नाव सध्या बरंच गाजतंय आणि ते नाव बिग बॉसचंही घर गाजवतंय. सूरज चव्हाण (Suraj Chavan) हा बिग बॉसच्या घरात सध्या बराच चर्चेत आला आहे. सुरुवातीपासून सूरजचा खेळ ही प्रत्येकाला आवडतोय. त्याचप्रमाणे घरातले ज्या प्रमाणे त्याच्याशी वागतायत त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीच टीका देखील केली जातेय. त्यातच आता सूरजसाठी एका मराठी अभिनेत्याने केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे.
अभिनेता आस्ताद काळे याने त्याच्या सोशल मीडियावर सूरजसाठी पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने पु.ल देशपांडे यांच्या हरी तात्या या व्यक्तिचित्राचा संदर्भ दिला आहे. आस्तादने या पोस्टमध्ये सूरजची पाठ थोपटलीच, पण त्याच्यासाठी त्याने अभिमानास्पद शब्दही वापरले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या आस्तादची ही पोस्ट बरीच चर्चेत आली आहे.
आस्तादने त्याच्या पोस्टमध्ये काय म्हटलं?
आस्तादने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, पु.ल देशपांड्यांच्या "हरी तात्या" या व्यक्तीचित्रात एक भाग आहे."हरी तात्यांनी कधी आम्हाला पैशाचा खाऊ नाही दिला. पण आमच्या लहानग्या जीवांमधे एक अभिमान मात्र भरला. इवल्याशा मनगटांमधे छोट्याशा मनगट्या बांधल्या. त्या हातांची मूठ बनवायचं शिक्षण नकळत दिलं.दुर्दैवानं ही मूठ प्रत्येक वेळी वळतेच असं होत नाही, पण अगदीच गरज पडली तर वळू शकेल, हा विश्वास आजही कुठेतरी वाटतो, तो हरी तात्यांमुळेच.""सूरज चव्हाण"साठी त्याचं आयुष्यच या बाबतीत "हरी तात्या" आहे.
पुढे त्याने म्हटलं की, उगाच मनगटं परजत, मुठी आवळून फिरत नाही तो. पण वेळप्रसंगी तो मूठही आवळेल, आणि अंगावर आलेल्यांना शिंगावरही घेईल. हा खरा मराठी मातीतला काटक, कसलेला मावळा वाटतो.सूरज...मित्रा...तुला खूप यश लाभो....
कलाकारांनी थोपटली सूरजची पाठ
दरम्यान कॅप्टन्सी टास्कसाठी सूरज अरबाजसोबत नडताना पाहायला मिळणार आहे. या प्रोमोवर अनेक कलाकांनी कमेंट्स करत सूरजच्या गेमचं कौतुक केलं आहे. मेघाने कमेंट करत म्हटलं की, सूरज... भीड बिनधास्त, दाखव तुझा गावठी हिसका यांना. खूप कमी लेखलंय तुला या सगळ्यांनी.. नड भावा नड.. उत्कर्ष शिंदेने कमेंट करत म्हटलं की, डर होना और वो भी सामने वाले कें दिल में होना चाहिए. क्या बात हैं सूरज. एक ओळ आठवली सूरजचा आत्मविश्वास पाहून... जब भी मारुँगा घुस के मारुँगा... अभिनेत्री अक्षय्या नाईकने कमेंट करत म्हटलं की, जान्हवी आणि निक्कीच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती दिसली.. अब आएगा मजा. अभिनेत्री साक्षी गांधी हिने कमेंट करत म्हटलं की, सूरज यांना दाखव तुझा तडका...
ही बातमी वाचा :
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
महत्त्वाच्या बातम्या





















