एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता 'द कपिल शर्मा शो'मधून नवज्योतसिंह सिद्धू बाहेर!
ही बाब सिद्धू यांना आवडली नाही आणि त्यांनी कपिलला कॉल करुन झापलं. कपिलनेही सिद्धूंना संपूर्ण प्रकरण समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही ऐकण्याची मनस्थितीत नव्हते.
मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमधून टीममधील अनेक कलाकारांच्या एक्झिटनंतर आता नवज्योत सिद्धू यांचंही नाव या यादीत अॅड झालं आहे. नवज्योतसिंह सिद्धू मागी अनेक दिवसांपासून आजारी आहेत.
आता कपिल शर्मा शोमध्ये नवज्योत सिद्धू यांच्या जागी अर्चना पूरणसिंह दिसण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
कपिल शर्मा आणि नवज्योत सिद्धू यांच्यात खुर्चीबाबत वाद सुरु असल्याची चर्चा होती. सिद्धू आजारी होते, त्यांना खूप ताप होता. त्यामुळे कपिलच्या रविवारच्या शोचं शूटिंग थांबलं. शिवाय त्यांची खुर्चीही रिकामी झाली होती. परंतु कपिलने सिद्धू परत येण्याची वाट न पाहताच त्यांच्या जागी अर्चना पूरणसिंह यांना बसवलं.
ही बाब सिद्धू यांना आवडली नाही आणि त्यांनी कपिलला कॉल करुन झापलं. कपिलनेही सिद्धूंना संपूर्ण प्रकरण समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही ऐकण्याची मनस्थितीत नव्हते.
सिद्धूंकडून शोसाठी अनेक वेळा अॅडजस्टमेंट
खरंतर नवजोतसिंह सिद्धू यांनी अनेकदा कपिलच्या शोसाठी वेळ अॅडजस्ट केली आहे. मुंबईत राहण्याची सोय नसतानाही सिद्धू यांनी अॅडजस्ट केलं. निर्धारित वेळत शोची एडिटिंग व्हावी, यासाठी त्यांनी दो ते तीन दिवस आधीही शूटिंग केलं. अशा परिस्थितीत कपिलने आपला पर्याय शोधावं, ही बाब सिद्धू यांना पसंत पडली नाही.
अर्चना पूरणसिंह काय म्हणाल्या?
आता नवज्योतसिंह सिद्धू या शोमधून बाहेर झाले आहे. याची माहिती खुद्द अर्चना पूरणसिंह यांनी एका बातचीतदरम्यान दिली. अर्चना पूरणसिंह म्हणाल्या की, "शोच्या प्रेक्षकांना सिद्धूंना या खुर्चीवर बसलेले पाहण्याची सवय झाली आहे. सिद्धू यांच्या खुर्चीवर बसायला मला वेगळं वाटतंय. कपिल शर्माने मला शूटिंगच्या दिवशीच बोलावलं. तो माझा जुना मित्र असल्याने मी त्याला टाळू शकले नाही. मी कपिल शर्माच्या शोमध्ये फक्त काही एपिसोडमध्ये दिसणार आहे. सिद्धू यांची प्रकृती सुधारल्यानंतर ते पुन्हा आपल्या खुर्चीवर विराजमान होतील."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement