Appi Aamchi Collector : मेहेनत फळास आली, अप्पी आमची कलेक्टर झाली! 16 एप्रिलला रंगणार एक तासाचा विशेष भाग
Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचा 16 एप्रिलला एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे.
Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिका सुरू झाल्यापासून अप्पी कधी कलेक्टर होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर आता तो दिवस जवळ आला आहे. मालिकेच्या आगामी भागात अप्पी कलेक्टर झालेली दिसणार आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या 11 आणि 12 एप्रिलच्या भागात अप्पीची मुलाखत वकील उज्वल निकम आणि आयएएस ऑफिसर विश्वास पाटील घेताना दिसून आले आहेत. या मालिकेच्या निमित्ताने दोघांनी पहिल्यांदाच खरीखुरी भूमिका छोट्या पडद्यावर साकारली. आता मालिकेच्या आजच्या भागात अप्पी निकालाची प्रतीक्षा करताना दिसणार आहे.
अप्पीची मेहनत फळास आली...
अप्पीचा निकाल येत्या 16 एप्रिलला लागणार असून तिची मेहनत फळास येणार आहे आणि मालिकेच्या आगामी भागात ती कलेक्टर झालेली दिसून येईल. त्यानिमित्ताने अर्जुन, छकुली, दिप्या आणि गर्व गावकरी मिळून तिची मिरवणूक काढणार आहेत. मेहनतीच्या जोरावर अप्पी कलेक्टर झाल्याने गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सुरुवातीलाच गावकरी अप्पीच्या नावाची फुलांची रांगोळी काढताना दिसत आहेत. तसेच छकुली अप्पी दीदीचा निकाल आहे...ती कलेक्टर होणार आहे असं जोरजोरात ओरडताना दिसत आहे. दरम्यान अप्पीचा पती अर्थात अर्जुन तिला डोळ्यावर पट्टी बांधून एका ठिकाणी घेऊन येतो. त्याठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत अप्पी कलेक्टर झाल्याची घोषणा करण्यात येते. या प्रोमो व्हिडीओवर चाहते कमेंट्स करत अप्पीचं अभिनंदन करत आहेत.
View this post on Instagram
16 एप्रिलला रंगणार एक तासाचा विशेष भाग
अप्पीने आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन कलेक्टर झालेली दिसून येईल आणि या संघर्षात तिला तिचे बापू, नवरा अर्जुन, भाऊ आणि दिप्या यांची साथ मिळाली आहे. आता या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. येत्या 16 एप्रिलला संध्याकाळी सात वाजता मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे. या विशेष भागात अप्पी कलेक्टर झाल्याचं दिसून येईल.
संबंधित बातम्या