एक्स्प्लोर
सगळ्यांना भरावा लागणार GST... अमेय वाघचा उखाणा

मुंबई : वेब सीरिज, नाटक, सिनेमा आणि मालिका अशी चौफेर मुशाफिरी करणारा अभिनेता अमेय वाघ रविवारी विवाहबंधनात अडकला. त्यानंतर अमेयने फेसबुकवरुन इंटरेस्टिंग उखाणा घेतला आहे. चला नाव घेतो- देशात बदल घडतोय.. सगळ्यांना भरावा लागणार GST साजिरी मुळे माझ्या संसाराचा मुरांबा झालाय आणखीनच tasty हा उखाणा अमेयने मंगळवारी दुपारी फेसबुकवर पोस्ट केला. तासाभराच्या आतच साडेचार हजारांहून जास्त लाईक्स आणि शेअर्स आले आहेत. कमेंट्समधूनही अमेयच्या उखाण्याचं कौतुक आणि लग्नाच्या शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. पुण्याच्या श्रुतिमंगल कार्यालयात रविवारी अमेयचं लग्न त्याची बालमैत्रीण साजिरी देशपांडे हिच्याशी झालं. लग्नाच्या आधीपासूनच अमेयने #वाघाचीझालीशेळी हा हॅशटॅग ट्रेण्ड केला होता. लग्नात साजिरीने सुंदर नववारी साडी नेसली होती, तर अमेयने नक्षीदार शेरवानी घातला होता. अमेयच्या लग्नाला चित्रपटसृष्टीतील अनेक तारेतारकांनी हजेरी लावली होती. नुकताच अमेयचा 'मुरांबा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. झी मराठीवर दिल दोस्ती दोबारा या मालिकेतही तो झळकला होता. रंगभूमीवर अमर फोटो स्टुडिओ हे नाटकही गाजत आहे. तर भाडिप, बॉयगिरी या वेबसीरिजमध्येही अमेय चमकत आहे.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
टेलिव्हिजन
टेलिव्हिजन
टेलिव्हिजन






















