एक्स्प्लोर
कपिलच्या शोमध्ये 'नानी'ची 'घरवापसी'?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायम
नवी दिल्ली : विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील वादानंतर सुनील ग्रोव्हरसह अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी कपिलच्या शोवर बहिष्कार टाकला. पण यातील अली असगर आपलं बहिष्काराचं अस्त्र म्यान करण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शोमध्ये 'नानी' (पणजी आजीची) भूमिका साकारणारा अली असगर लवकरच शोमध्ये पुन्हा दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलच्या आज शूट होणाऱ्या शोसाठी अली असगर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे सुनील ग्रोव्हर आणि चंदन प्रभाकर यांच्यासंबंधी सस्पेंस अजूनही कायम आहे.
जेव्हापासून कपिल आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात वाद झाले, तेव्हापासून कपिलच्या शोवरुन अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या वादानंतर शो सुरु ठेवण्यासाठी शो सोडून गेलेल्यांची व्यक्तीरेखा साकरण्यासाठी राजू श्रीवास्तव, अहसान कुरेशी आणि सुनील पॉल यांची रिप्लेसमेंट करण्यात येईल, अशीही चर्चा होती.
मात्र, अली असगर, सुनील ग्रोव्हर आणि चंदन प्रभाकर यांची रिप्लेसमेंट निर्मात्यांनाही अशक्य ठरली. त्यातच प्रेक्षकांच्या गोंधळानंतर प्रक्षेपित झालेल्या शोला टीआरपीही चांगला मिळाला नाही. त्यामुळे शोच्या व्यवस्थापकांनीही मवाळ भूमिका घेतली आहे.
संबंधित बातम्या
सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट
एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत
…म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?
‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?
कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर
कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?
सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट
…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement