(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajunahi Barsaat Aahe : 'अजूनही बरसात आहे' मालिका घेणार निरोप, मनूची भावूक पोस्ट व्हायरल
Ajunahi Barsaat Aahe : 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतील मनूची म्हणजेच अभिनेत्री पूर्वा कौशिकची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ajunahi Barsaat Aahe : 'अजूनही बरसात आहे' (Ajunahi Barsaat Aahe) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि मुक्ता बर्वे (Mukta Barve) मुख्य भूमिकेत होते. मालिकेत मुक्ता मीराची भूमिका साकारत होती आणि उमेशने आदिराजचे पात्र साकारले होते. तर पूर्वा कौशिकने मीराच्या धाकट्या बहिणीचे पात्र साकारले होते. मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने पूर्वा कौशिक भावूक झाली आहे.
पूर्वा कौशिकने मालिकेतील सहकलाकारांसोबतचे फोटो शेअर करत लिहिले आहे,"आठवणींनाही सुगंध असतो. याची जाणीव घरी परत येताना होत होती. आठवणींचा हा गंध आता माझ्या मनात आयुष्यभर जपला जाईल. गेल्या आठ महिन्यांच्या प्रवासात मला मिळालेले अनुभव, मी अनुभवलेली माणसं याचं एक सुंदर कोलाज घेऊन मी पुढे जाणार आहे, याचा आनंद आहे, पण तुम्हां सगळ्यांची आठवण येत राहणारच आहे. पुढच्या एखाद्या वळणावर पुन्हा ही मैफिल जमेल या आशेनेच आजचा दिवस उजाडला आहे. या प्रवासाने मला माझ्या अभिनयाच्या वाटचालीतला परिपूर्ण अनुभव दिला. मला एक ओळख दिली".
View this post on Instagram
पूर्वाने पुढे लिहिले आहे,"तुम्हां सगळ्यांशी जुळलेलं नातं खूप काही शिकवून गेलं. आयरीस प्रॉडक्शन आणि त्याचा संपूर्ण चमू, दिग्दर्शक आणि माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा तुम्हां सगळ्यांबरोबर मला काम करायला मिळालं, हे माझं भाग्यच आहे. नवीन आणि अनुभवी असलेल्या मला तुम्ही सांभाळून घेतलंत आणि मला सहनही केलंत. काय बोलू... शब्द नाहीत माझ्याकडे. तुमची लाडकी मनू"
'अजूनही बरसात आहे' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेची जागा 'सुंदर आमचे घर' या मालिकेने घेतली आहे. 14 मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
83 World Television Premiere : 'जीतेगा जीतेगा, इंडिया जीतेगा', 'या' दिवशी होणार '83' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
Nagraj Manjule : 'झुंड'च्या यशानंतर नागराज मंजुळे लवकरच मिस्टर परफेक्शनिस्टसोबत करणार काम? आमिर खानदेखील आहे तयार
Women Centric Films : 'गंगूबाई काठियावाडी' ते 'नीरजा', स्त्रीप्रधान सिनेमांनी जिंकली प्रेक्षकांची मने, बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींहून अधिक कमाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha