एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : लोककलावंतांसाठी अजय-अतुल खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ!

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात अजय-अतुल सहभागी होणार आहेत.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात अजय-अतुल लोककलावंतांसाठी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळताना दिसणार आहेत. 

'कोण होणार करोडपती'चा रंगणार शेवटचा भाग

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमुळे, त्यांच्या संघर्ष कहाण्यांमुळे कायमच इतरांना प्रेरणा मिळते. तर दर शनिवारी रंगणाऱ्या विशेष भागांमुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार होतो. या शनिवारच्या विशेष भागात अवघ्या देशाला आपल्या गाण्यांनी ठेका धरायला लावणारे संगीतकार अजय - अतुल या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या शनिवारी 'कोण होणार करोडपती'च्या या पर्वाचा शेवटचा भाग असून अजय- अतुल यांच्या उपस्थितीत या पर्वाची सांगता होणार आहे. जेजुरी येथील शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंच या लोकवंतांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेसाठी अजय-अतुल हा खेळ खेळणार आहेत. 

'कोण होणार करोडपती'च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी झाले. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. या पर्वात आत्तापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, तनुजा, ज्येष्ठ समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती, सदाबहार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, संदीप वासलेकर, अधिक कदम, डॉ. तात्याराव लहाने, द्वारकानाथ संझगिरी  या भागांमध्ये सहभागी झाले होते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

'कोण होणार करोडपती'च्या या पर्वाची सांगता अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीने होणार आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाची म्युझिकल थीम आणि अजय अतुल यांचं विशेष नातं आहे. त्यामुळेच त्यांनी 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात आठवणींना उजाळा दिला. 'शाहीर साबळे, शाहीर विठ्ठल उमप, अण्णाभाऊ साठे, प्रल्हाद शिंदे या सगळ्या लोककलावंतांनी  मराठी साहित्य आणि संस्कृतीचे जतन करून अमूल्य वारसा आपल्याला उपलब्ध करून दिला. आमच्यावरही गाण्याचे संस्कार या लोकलावंतांनी केले आहेत', असे मनोगत अजय अतुल यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर व्यक्त केले. त्याचबरोबर संगीत ही शिकत राहण्याची गोष्ट आहे, त्यामुळे शिकत राहा, असा सल्ला त्यांनी तरुण कलाकरांना यावेळी दिला. 

'कोण होणार करोडपती'चे हे पर्व खऱ्या अर्थाने अद्भुत ठरले. विविध वयोगटातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पर्धक या पर्वात सहभागी झाले होते. अनेकांचा संघर्ष पाहून डोळ्यात पाणी दाटून आले तर अनेकांचे अनुभव ऐकून निःशब्द व्हायला झाले. काही स्पर्धकांची पहिली कमाई या मंचाने मिळवून दिली तर अनेकांनी आपल्या कामातून इतरांना प्रेरणा दिली. अशा या गाजलेल्या पर्वाची भैरवी अजय- अतुल या प्रसिद्ध संगीतकार जोडीसह होणार आहे. यावेळी अजय- अतुल यांनी मनमोकळेपणाने वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. घरी संगीतकार व्हायचंय असं म्हणल्यानंतर आलेली प्रतिक्रिया काय होती, गणपती बाप्पावरची श्रद्धा, पुण्यातील गणेशोत्सवातील आठवणी, मुंबई शहराबद्दल ऋण अशा अनेक विषयांवर अजय अतुल व्यक्त झाले आहेत. त्यामुळे हा शेवटचा भाग प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. 

कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप

संबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता खेळणार 'कोण होणार करोडपती'; मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा

Kon Honaar Crorepati : पुन्हा येतोय 'कोण होणार करोडपती' कार्यक्रम, 23 फेब्रुवारीपासून नावनोंदणीला सुरुवात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : मोदींच्या 18 सभा, 14 जागी पराभव; काय काय म्हणाले शरद पवार ?ABP Majha Headlines :  9:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 29 June 2024 : ABP MajhaPune Tanker Accident :  पुण्यात अल्पवयीन मुलाकडून पुन्हा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Horoscope Today 29 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget