एक्स्प्लोर
'सैराट'मुळे 'द कपिल शर्मा शो' TRP मध्ये अव्वल !
मुंबई: नागराज मंजुळेच्या 'सैराट'ची जादू हिंदी रिअॅलिटी शोजमध्येही पाहायला मिळाली. दोन आठवड्यांपूर्वी सैराटच्या टीमनं 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती.
पहिल्यांदाच एका हिंदी कार्यक्रमात मराठी फिल्मचं प्रमोशन झालं. त्यामुळे हा शो चांगलाच गाजला. इतकंच नाही तर या एपिसोडसह हायेस्ट टीआरपी मिळवत 'द कपिल शर्मा शो' नंबर वन बनला.
संबंधित बातमी व्हायरल सत्य : आर्ची अर्थात रिंकूला शाळेतून काढणार?
'द कपिल शर्मा शो'मध्ये हिंदी सिनेमांचं प्रमोशन होतं. मात्र पहिल्यांदाच सैराटच्या निमित्ताने मराठी सिनेमाचं प्रमोशन झालं. मात्र याचा फायदा चाहत्यांनी डोक्यावर घेतलेल्या 'सैराट'ला नव्हे तर 'द कपिल शर्मा शो'ला झाल्याचं टीआरपी रेटिंगमधून पाहायला मिळालं. 'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिलसोबत आर्ची, परशासह सर्व कलाकारांनी अक्षरश: धमाल केली. दुसरीकडे सैराटच्या यशानंतर अनेक वाहिन्यांवर या सिनेमातील कलाकारांच्या, तसंच दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या मुलाखती झाल्या. या दरम्यान त्या-त्या वाहिन्यांचेही टीआरपी वाढल्याचं रेटिंगमधून दिसून आलं. संबंधित बातम्या'द कपिल शर्मा शो'मध्ये झिंग झिंग झिंगाट
'सैराट'ची कथा माझ्या कादंबरीवरुन ढापली, लेखक कोर्टात
नव्या सिनेमात परशासोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
आधी सैराट, आता उडता पंजाब, सेन्सॉर कॉपी लीक होतेच कशी, रितेशचा सवाल
VIDEO : माधुरीच्या शोमध्ये आर्ची-परशाचा धुमाकूळ
व्हायरल सत्य : आर्ची अर्थात रिंकूला शाळेतून काढणार?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement