Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर 'झलक दिखला जा'मध्ये होणार सहभागी; रंगणार चुरशीची स्पर्धा
Jhalak Dikhla Jaa : 'झलक दिखला जा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो आहे. या कार्यक्रमात आता अमृता खानविलकरदेखील सहभागी होणार आहे.
Amruta Khanvilkar : 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhla Jaa) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो आहे. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील (Amruta Khanvilkar) 'झलक दिखला जा 10' या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
अमृता खानविलकरसोबत 'बिस बॉस 11'ची विजेती शिल्पा शिंदेदेखील (Shilpa Shinde) 'झलक दिखला जा 10' मध्ये सहभागी होणार आहे. 'भाभी जी घर पर है' फेम शिल्पा गेल्या अनेक दिवसांनी छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. मीडिया हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अमृता 'झलक दिखला जा' या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे.
अमृता 'झलक दिखला जा' या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने चाहते आनंदी झाले आहेत. याआधीदेखील अमृता 'खतरों के खिलाडी 10' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात अमृता स्टंटबाजी करताना दिसून आली होती. अमृता अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम नृत्यांगणादेखील आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमृता 'चंद्रमुखी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील अमृताचे 'चंद्रा' हे गाणं प्रचंड गाजलं होतं.
'झलक दिखला जा' पाच वर्षांनी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'झलक दिखला जा' हा लोकप्रिय कार्यक्रम पाच वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'झलक दिखला जा'च्या दहाव्या पर्वात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. पारस कलनावत (Paras Kalnawat), धीरज धूपर (Dheeraj Dhoopar), निया शर्मा (Nia Sharma), गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) आणि नीती टेलर (Niti Taylor) असे अनेक कलाकार 'झलक दिखला जा'च्या दहाव्या पर्वात सहभागी होणार आहेत.
'झलक दिखला जा 10'चा प्रोमो आऊट
'झलक दिखला जा 10'चा प्रोमो आऊट झाला आहे. युट्यूबवर या व्हिडीओला 60 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 'झलक दिखला जा 10'च्या परिक्षणाची धुरा सिने-निर्माता करण जोहर (Karan Johar), अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सांभाळणार आहे. तर भारती सिंह या कार्यक्रम होस्ट करू शकते असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या