एक्स्प्लोर

Abhijit Amkar : नऊ वर्षांपूर्वी पदार्पण अन् आता त्याच वाहिनीवर दमदार कमबॅक, स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

अभिनेता अभिजीत आमकर हा तब्बल 9 वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करणार असून स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Abhijit Amkar : स्टार प्रवाह वाहिनीवर (Star Pravah) येत्या 23 डिसेंबरपासून 'तू ही रे माझा मितवा' (Tu Hi Re Maza Mitwa) ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये सध्या बरीच उत्सुकता आहे. याच मालिकेच्या निमित्ताने तब्बल 9 वर्षांनी अभिनेता अभिजीत आमकर हा दमदार कमबॅक करणार आहे. या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना अभिजीत आमकरने (Abhijit Amkar) काही खास गोष्टी सांगितल्या. 
 
दरम्यान नऊ वर्षांच्या कमबॅकनंतर अभिजीतने प्रतिक्रिया देत या मालिकेविषयी भाष्य केलं आहे. तसेच त्याने त्याची उत्सुकता देखील या निमित्ताने व्यक्त केली आहे. अभिजीतची नेमकी  भूमिका काय आहे याविषयी देखील अभिजीतने भाष्य केलं आहे. तसेच त्याची भूमिका नेमकी कशी असणार याविषयी देखील अभिजीतने सांगितलं आहे. अभिजीतने नऊ वर्षांपूर्वी अरे वेड्या मना या मालिकेतूनच पदार्पण केलं होतं. आता तो त्याच वाहिनीवरुन नऊ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मालिकेविषयी अभिजीतने काय म्हटलं?

या मालिकेविषयी बोलताना अभिजीतने म्हटलं की, या मालिकेतून एक अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या प्रेमात जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हटलं तर  एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका आहे. 

भूमिकेविषयी अभिजीतने काय म्हटलं?

अभिजीतने त्याच्या भूमिकेविषयी सांगताना म्हटलं की, अर्णव सात्विका राजेशिर्के असं मी साकारत असलेल्या पात्राचं नाव आहे. प्रचंड कष्टाळू, प्रामाणिक पण तितकाच रागीट आणि गर्विष्ठ स्वभावाचा असा हा अर्णव. अर्णवला फसवणूक करणाऱ्यांविषयी मनस्वी चीड आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी तो काहीही करु शकतो. स्वबळावर सगळं करता येतं यावर त्याचा विश्वास आहे. त्याचं विश्व तो आणि त्याची बहीण इतकंच आहे. यापलीकडे तो कुणाहीसाठी कसलाही त्याग करु शकत नाही. अर्णव आणि माझ्या स्वभावात बरंच साम्य आहे. अर्णव प्रमाणेच माझ्या आयुष्यात व्यायामाला प्रचंड महत्त्व आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून मी न चुकता व्यायाय करतो. 

पुढे अभिजीतने म्हटलं की, स्टार प्रवाह मला माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहे. 9 वर्षांपूर्वी मी स्टार प्रवाहच्या अरे वेड्या मना मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा हा योग जुळून आला आहे. महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडला जातोय याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे. 

मालिकेतील लूकविषयी अभिजीतने काय म्हटलं?

या मालिकेतील लूकविषयी बोलताना अभिजीतने म्हटलं की, या मालिकेतल्या माझ्या लूकवर बरीच मेहनत घेण्यात आली आहे. तो यशस्वी उद्योजक आहे. त्यामुळे बऱ्याचदा तो ब्लेजरमध्ये वावरताना दिसणार आहे. सुरुवातीला मला या कपड्यांमध्ये वावरणं थोडं कठीण गेलं. मात्र आता मला याची सवय झाली आहे. मी स्वत: या लूकच्या प्रेमात पडलो आहे. प्रेक्षकांना पण हा लूक नक्की आवडेल याची खात्री आहे.

ही बातमी वाचा : 

Deepveer Daughter Dua Viral Photo : मम्मा दीपिका, पप्पा रणवीरनं शेअर केलाय चिमुकल्या 'दुआ'चा फोटो? सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Sara Tendulkar : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Video : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषणABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 18 December 2024Uddhav Thackeray Full PC :  भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेतRam Shinde News : विधानपरिषद सभापती पदी राम शिंदे यांची निवड निश्चित, निलम गोऱ्हेंबाबत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Sara Tendulkar : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Video : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Ravichandran Ashwin : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
Video : चॅम्पियन्स ट्राॅफी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पाॅझ अन् वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सोडलेला तो वाईड बाॅल! अश्विन अण्णा विसरणे नाही
IPO Update : MobiKwik चा आयपीओ लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, 85 टक्के रिटर्न्स, गुंतवणूकदारांची दिवाळी
पहिल्यांदा आयपीओ थांबवला, योग्य वेळी लाँच केला, मोबिक्विचा IPO लिस्ट होताच शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Gold Silver Rate : सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम, गुंतवणुकीची चांगली संधी, दर कितींवर पोहोचले?
Embed widget