Abhijeet Sawant Bigg Boss Marathi Season 5 : सूरांचा बादशाह दुसऱ्या स्थानावर, अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा रनर अप
Abhijeet Sawant Bigg Boss Marathi Season 5 : अभिजीत सावंत हा बिग बॉस मराठीचा रनर अप ठरला आहे.
![Abhijeet Sawant Bigg Boss Marathi Season 5 : सूरांचा बादशाह दुसऱ्या स्थानावर, अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा रनर अप Abhijeet Sawant Runner up in Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Bigg Boss Marathi New Season Entertainment news in marathi Abhijeet Sawant Bigg Boss Marathi Season 5 : सूरांचा बादशाह दुसऱ्या स्थानावर, अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा रनर अप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/06/c45024322168510de1f37e7be12baeab1728229797980720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Abhijeet Sawant Bigg Boss Marathi Season 5 : सुरांचा बादशाह अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) याने बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात एन्ट्री घेतली आणि त्याच्या हटके खेळाला सुरुवात केली. त्याच्या खेळावर घरात आणि घराबाहेर बरीच चर्चा होऊ लागली होती. तसेच त्याच्या खेळावर बरेच प्रश्नही उपस्थित केले जात होते. पण या सगळ्याला उत्तर देत अभिजीत सावंतने बिग बॉस मराठीच्या रनर अपवर नाव कोरलं आहे.
अभिजीतने त्याच्या खेळाच्या सुरुवातीला ग्रुप बी मधून सुरुवात केली होती. पण त्याचं आणि निक्कीचं नातं हे घरातल्यांना बरंच खटकायचं. तरीही अभिजीतने त्याची निक्कीसोबतची मैत्री ही कायम ठेवली. इतकच नव्हे तर शेवटच्या दिवसांमध्ये त्याचं आणि अंकिताचं तुफान वाजलंही. असं असलं तरीही अभिजीतने आता रनर अपवर त्याचं नाव कोरलंय.
सूरज चव्हाण विजेता
बिग बॉस मराठी सीझन 5च्या विनर ट्रॉफीवर सूरजने आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरलं आहे. सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर होती. त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झालंय. इतकच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षाही तो वरचढ ठरलाय.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)