एक्स्प्लोर
नेहा पेंडसेसोबत फोटोवर अभिजीत खांडकेकरचं 'काँग्रॅच्युलेशन्स'
नेहा पेंडसेभोवती कोंडाळं करुन पाच जण उभे असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. नेहाने हाताची घडी तोंडावर बोट ठेवलं आहे. एका बाजूने श्रुती मराठेने, तर दुसरीकडून हेमांगी कवीने मिठी मारली आहे.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकरने नेहा पेंडसे, श्रुती मराठे, हेमांगी कवी यासारख्या मराठी अभिनेत्रींसोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन खळबळ उडवली आहे. खळबळ उडण्याचं कारण म्हणजे अभिजीतने फोटोखाली 'काँग्रॅच्युलेशन्स' असं कॅप्शन टाकलं आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चाहत्यांमध्ये तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे.
नेहा पेंडसेभोवती कोंडाळं करुन पाच जण उभे असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. नेहाने हाताची घडी तोंडावर बोट ठेवलं आहे. एका बाजूने श्रुती मराठेने, तर दुसरीकडून हेमांगी कवीने मिठी मारली आहे. त्यामुळे नेहाचा साखरपुडा ठरल्याची अटकळ काही चाहत्यांनी बांधली. कोणी त्यांचा नवा प्रोजेक्ट येत असल्याचा तर्क लढवला, तर कोणी नेहा 'मराठी बिग बॉस'मध्ये झळकणार असल्याची पुडी सोडली.
नेहाने मात्र या सर्व चर्चा धुडकावून लावल्या आहेत. ना माझा साखरपुडा झाला, ना लग्न ठरलंय. ना मी बिग बॉसमध्ये जाण्याच्या विचारात आहे. नेहाच्या स्पष्टीकरणामुळे अभिजीतच्या पोस्टमागील गूढ वलय अधिकच गडद झालं आहे.
नेहा बिग बॉसच्या बाराव्या पर्वात झळकल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नेहाचे पोल डान्स व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. नेहा पेंडसेने 'भाग्यलक्ष्मी' या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती, तर 'एकापेक्षा एक अप्सरा आली' या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही मजल मारली होती. टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. 1996 मधील 'हसरतें' या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. त्यानंतर 'मे आय कम इन मॅडम?' या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. प्यार कोई खेल नही, देवदास, दिल तो बच्चा है जी अशा बॉलिवूडपटांमध्येही ती झळकली होती. त्याशिवाय तिने तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम सिनेमातही काम केलं आहे.View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement