Aata Hou De Dhingana : स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या सेटवर अवतरली चंद्रमुखी; सिद्धार्थ अन् अमृतानं चंद्रा गाण्यावर धरला ठेका
अभिनेत्री अमृता खानविलकर, दौलतराव म्हणजेच अभिनेता आदिनाथ कोठारे आणि डॉली म्हणजेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) यांनी आता होऊ दे धिंगाणाच्या सेटवर खास हजेरी लावली.
![Aata Hou De Dhingana : स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या सेटवर अवतरली चंद्रमुखी; सिद्धार्थ अन् अमृतानं चंद्रा गाण्यावर धरला ठेका Aata Hou De Dhingana Siddharth jadhav amruta khanvilkar dace on chandramukhi Chandra song Aata Hou De Dhingana : स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या सेटवर अवतरली चंद्रमुखी; सिद्धार्थ अन् अमृतानं चंद्रा गाण्यावर धरला ठेका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/27d4a6c13f6a98b5fabef6d2b03bfeb51663748849968259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aata Hou De Dhingana : स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Aata Hou De Dhingana) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. सिद्धार्थ जाधवचं ( Siddhartha Jadhav) खुमासदार सूत्रसंचालन आणि सोबतीला कलाकारांची म्युझिकल मैफल यामुळे या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढतेय. या आठवड्यात या मंचावर लढत रंगणार आहे ती लग्नाची बेडी आणि अबोली मालिकेच्या टीममध्ये. विशेष म्हणजे या दोन्ही टीमचा उत्साह वाढवण्यासाठी या मंचावर खास हजेरी लावणार आहे चंद्रमुखी सिनेमाची टीम. येत्या रविवारी म्हणजेच 25 सप्टेंबरला चंद्रमुखी (Chandramukhi) सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. याच निमित्ताने चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर, दौलतराव म्हणजेच अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि डॉली म्हणजेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) यांनी आता होऊ दे धिंगाणाच्या सेटवर खास हजेरी लावली.
अबोली मालिकेच्या टीमला चिअर अप केलं अमृता खानविलकरने तर आदिनाथ कोठारे आणि मृण्मयी देशपांडेने साथ दिली लग्नाची बेडी मालिकेच्या टीमला. या दोन्ही टीममधून कोणती टीम विजयी ठरणार याची उत्सुकता नक्कीच आहे. या खास भागात अमृताने सिद्धार्थ जाधवला चंद्रा गाण्याच्या ठेक्यावर थिरकायला लावलं. तर लग्नाची बेडी मालिकेतील राघव म्हणजेच संकेत पाठकसोबत अमृताने सालसा हा नृत्यप्रकार सादर केला. तेव्हा पाहायला विसरु नका आता होऊ दे धिंगाणा शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
View this post on Instagram
स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेमध्ये सचित पाटील आणि अभिनेत्री गौरी कुलकर्णी हे प्रमुख भूमिका साकारतात. तर लग्नाची बेडी या मालिकेत अभिनेता संकेत पाठक, अभिनेत्री सायली देवधर हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकारतात.
पाहा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)