एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : आली समीप लग्नघटिका! अखेर अरुंधती-आशुतोष लग्नबंधनात अडकणार; देशमुखांच्या घरी लग्नाची लगबग सुरु

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे.

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक अरुंधती-आशुतोषच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असून अखेर आता अरुंधती आणि आशुतोष लग्नबंधनात अडकणार आहेत. 

'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोषसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला. मात्र यश आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पाहतंय.

आशुतोष-अरुंधतीच्या लग्नासाठी देशमुख कुटुंबाची लगबग

अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातूनच होणार असं ठामपणे सांगितलं. त्यामुळेच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि विवाह देशमुखांच्या घरातच होणार आहे. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अरुंधतीने स्वत:च्या आवडी-निवडी बाजूला ठेवल्या. मात्र आशुतोषमुळे अरुंधतीच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले. गाण्याची आवड जपता जपता आशुतोषच्या रुपात तिला आयुष्याचा साथीदार मिळाला. 

अरुंधतीच्या आयुष्यात नवा अध्याय सुरु होतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अरुंधतीच्या मनात संमिश्र भावना नक्कीच आहेत. ज्या घराने इतकं भरभरुन प्रेम दिलं त्या घरातून पाठवणी होताना तिचेही डोळे पाणावलेत. अरुंधतीच्या या नव्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार सायंकाळी 7.30 वाजता 'आई कुठे काय करते' ही मालिका पाहावी लागणार आहे.  

अरुंधतीचा नववधू लुक कसा आहे? 

'नवरी सजतेय' असं म्हणत स्टार प्रवाहने अरुंधतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरुंधतीचा नववधू लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. भगव्या रंगाची पैठणी, कपाळावर मुंडावळ्या, हिरवा चुडा आणि चंद्रकोर असा अरुंधतीचा नववधू लूक आहे. या व्हिडीओवर खूप गोड आहे नवरी, खूपच सुंदर, आता लग्नाची प्रतीक्षा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 03 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 20 November 2024Hitendra Thakur : तावडेंची अवस्था भिजलेल्या कोंबडी सारखी होती, ठाकूर पुन्हा बरसले ABP MAJHADahisar Voting Controversy : केंद्रावर जाण्याआधीच झालं होतं मतदान,स्थानिकांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
Embed widget