Aai Kuthe Kay Karte : 'देव करो मालिकेचा दुसरा भाग कधीच येऊ नये', प्रेक्षकांचा निरोप घेणाऱ्या 'आई कुठे काय करते'वर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यावर आता नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय.
![Aai Kuthe Kay Karte : 'देव करो मालिकेचा दुसरा भाग कधीच येऊ नये', प्रेक्षकांचा निरोप घेणाऱ्या 'आई कुठे काय करते'वर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया Aai Kuthe Kay Karte Marathi serial trolled on social media before going off air Entertainment television news in marathi Aai Kuthe Kay Karte : 'देव करो मालिकेचा दुसरा भाग कधीच येऊ नये', प्रेक्षकांचा निरोप घेणाऱ्या 'आई कुठे काय करते'वर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/8f0dce4615bca5c5f19dcc31de86167c1732505677946720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता पाच वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेच्या अंतिम भागाचाही प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वीच मालिकेच्या शेवटच्या भागाचंही शूटींग झालं. त्यावेळी मालिकेतील कलाकारांनी एकत्र जमून हा शेवटचा दिवस साजराही केला. पण या मालिकेवर मागच्या काळामध्ये प्रेक्षकांचा बराच रोष होता. आता मालिका संपणार हे समजल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पाहायला मिळतंय.
आई कुठे काय करते मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत मालिका संपत असल्याचा आनंद व्यक्त केला असल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे मालिकेचं दुसरं पर्व कधीच सुरु होऊ नये अशीही इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
आई कुठे काय करते अंतिम भागाचा प्रोमो प्रदर्शित
मालिकेच्या अंतिम भागात अरुंधतीने अनिरुद्ध आणि संजनाला घराबाहेर काढते. अरुंधती अनिरुद्धला म्हणते की, तुम्हाला तुमचे आईवडील, तुमची मुलं,तुमची बायको, तुमचं घर,यातलं काहीही सांभाळता आलेलं नाही आणि वाट्याला काय आलं? त्याचप्रमाणे अनिरुद्धला अरुंधती तिचा समृद्धी बंगल्यातला हिस्सा देखील देते. पुढे अरुंधती म्हणते की,आता तुमची जागा इथे नाही,आता तुमची जागा घराबाहेर आहे..आठवतंय..शेवटी नियतीने तुम्हाला तुमची पातळी दाखवलीच...आता यापुढे कोणाची हिंमत होणार नाही हे विचारायची की, ‘आई कुठे काय करते ?’
प्रोमोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस
या प्रोमोवर एका युजरने कमेंट करत म्हटलं की, देव करो ह्या मालिकेचा दुसरं पर्व कधीच येऊ नये … हिच ईश्वर चरणी प्रार्थना. संपला विषय एकदाचा..आता परत सिक्वेल काढू नका बाबांनो, आम्हा लोकांचे पेशन्स नका पाहू, नशीब तिसर लग्न नाही दाखवल निलाजरा विषय दुर्ढावलेले लेखक आणि निर्माते.अशी सिरीअल बघुन प्रत्येक कुटुंबात दोन तीन अफेअर झाली तर विशेष काही नाही. प्लीज दुसरा भाग नको...बापरे!!!याच्या आधीच संपवायला हवी होती ही मालिका, अशा कमेंट्स या मालिकेच्या नव्या प्रोमोवर आल्याचं पाहायला मिळतंय.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)