Maharashtra Election Results 2024 : '...तोंड बंद ठेवून निर्णय मान्य करा,' महाराष्ट्राच्या विधानसभा निकालावर मराठी अभिनेत्याची खरमरीत पोस्ट चर्चेत
Maharashtra Election Results 2024 : विधानसभा निकालावर अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांची पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024 : राज्यातील विधानसभा निकालावर (Maharashtra Assembly Elections Results) विरोधकांकडून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं. त्यानंतर आता ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे विधानसभेचा निकाल जरी लागला असला तरीही आरोप-प्रत्यारोपांचा राजकारण काही थांबलेलं नाहीये. आता यावर एका मराठी अभिनेत्याची पोस्ट बरीच चर्चेत आलेली आहे. अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी ही पोस्ट केलेली आहे.
किरण माने हे ठाकरे गटाचे नेतेही आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात किरण माने यांनीही महाविकास आघाडीसाठी जोरदार प्रचार केला होता. खणखणीत भाषणं देखील त्यांनी केली होती. पण निकालानंतर या निकालावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक पोस्ट त्यांनी लिहिल्या आहेत. अशीच त्यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे.
किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?
किरण माने यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, ईव्हीएम हॅक होतं किंवा अदलाबदली होते, यावर 100 टक्के लोकांचा विश्वास बसलाय. सगळेच अस्वस्थ आहेत. संवेदनशील लोक, हे बंद होण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहिलं पाहिजे, म्हणून अस्वस्थ आहेत... कोडगे कारस्थानी लोकं, यावर बोलून का बिंग फोडकाय? हे तोंड बंद ठेवून निर्णय मान्य करा,म्हणून अस्वस्थ आहेत..!
महाराष्ट्र विधानसभा निकालांचे कौल
महाराष्ट्र विधानसभा निकालांमध्ये भाजपला 137, शिंदे गटाला 58, अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. महायुतीने एकूण 236 जागांवर विजय संपादित केला आहे. तसेच महाविकास आघाडीला एकूण 49 जागांवरच विजय मिळाला आहे. यामध्ये काँग्रेसला 16, ठाकरे गटाला 20 आणि शरद पवार गटाला 10 जागाला मिळाल्या आहेत. या निकालावर सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बरेच आरोप केले जात आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी मात्र हा निकाल मान्य केल्याचंही पाहायला मिळतंय.
अस्वस्थ सगळेच आहेत... कारणं वेगळी आहेत... pic.twitter.com/JM8y6xe3wC
— Kiran Mane (@kiranmane7777) November 24, 2024