Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्वीस्ट; अभिषेकचा होणार अपघात, गंभीर दुखापत झाल्याने अरुंधती-आशुतोषचा सिनेमाचा प्लॅन होणार कॅन्सल
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आगामी भागात अभिषेकचा अपघात होणार आहे.
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या इशाच्या लग्नामुळे चर्चेत आहे. दरम्यान मालिकेत आता एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. मालिकेच्या आगामी भागात अभिषेकचा मोठा अपघात झालेला दिसून येईल,.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इशा साखपरुज्याच्या जागेवरुन भांडताना दिसत आहे. साखरपुडा थाटामाटात व्हावं असं तिचं स्वप्न असल्याचं ती घरच्यांना सांगत आहे. अखेर इशाच्या मनाप्रमाणे साखरपुडा करण्याचं घरचे ठरवतात.
अभिषेकचा होणार मोठा अपघात
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात अभिषेक एका वयोवृद्ध व्यक्तीला वाचवायला जाणार आहे. त्या व्यक्तीला वाचवताना त्याची गाजी स्लिप होते आणि त्याला चांगलाच मार बसतो. त्याच्या एका हाताला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे एक तिसरी व्यक्ती त्याला आधार देत त्याच्या घरी घेऊन येते. अभिषेकचा जखमी अवस्थेत पाहून त्याच्या कुटुंबियांची मात्र पायाखालची जमीन सरकणार आहे.
अभिषेकला जखमी अवस्थेत पाहून अनघा त्याला आधार द्यायला पुढे जाते. अभिषेकवर रागावलेली अनघा त्याची काळजी करत असलेली दिसून येईल. त्यामुळे अभिषेक आणि अनघाच्या नात्यामधील गोडवा मालिकाप्रेमींना पुन्हा एकदा पाहायला मिळेल.
View this post on Instagram
दुसरीकडे अभिषेकचा अपघात झाल्याने अरुंधतीला मात्र अश्रू अनावर झाले आहेत. आशुतोषला ती अभिषेकच्या अपघाताबद्दल सांगणार आहे. अभिषेकचा अपघात झाल्याने आशुतोष सिनेमाचा प्लॅन कॅन्सल करणार आहे. आशुतोषने सिनेमाचा प्लॅन कॅन्सल केल्याने अरुंधती त्याची माफी मागताना दिसून येईल. त्यानंतर आशुतोष तिला समजावताना दिसेल.
अरुंधती पुन्हा भूतकाळात जाऊन येणार
अरुंधतीला आशुतोष आणि अनिरुद्धमध्ये मोठा फरक पुन्हा एकदा जाणवणार आहे. ज्या मसाल्याच्या वासामुळे अनिरुद्ध अरुंधतीला रागवायचा त्याच मसाल्यांचं आशुतोष कौतुक करणार आहे. त्यामुळे अरुंधती पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन येणार आहे. आता मालिकेत आणखी काय ट्वीस्ट येतात याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या