एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : "तू कमवायला लागली की सगळे चोचले कर"; कांचनताई ईशाची करणार कानउघडणी

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत आता ईशाच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नसोहळ्यानंतर मालिकेत आता ईशाच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत ईशा लग्नबंधनात अडकणार आहे. मालिकेच्या आगामी भागात ईशाच्या साखरपुड्याची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळेल. दरम्यान "तू कमवायला लागलीस की सगळे चोचले कर", अशी कांचनताई ईशाला समज देणार आहेत. 

ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला आहे. साखरपुडा ठरल्यामुळे दोघांच्याही घरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान मालिकेच्या आगामी भागात कांचन ताई ईशाला समज देताना दिसतील. सोन्याचे दागिने घेतल्यानंतर ईशा कांचनताईंना हिऱ्याच्या दागिन्यांचे डिझाइन दाखवणार आहे. त्यावर कांचनताई ईशाला तिची जागा दाखवत म्हणणार आहेत की,"तू कमवायला लागलीस की सगळे चोचले कर, हे दागिने आमच्याकडून आहेत. आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही तुला दागिने देणार आहोत". 

'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशा सासरी जाणार असल्याने अरुंधती भावुक होणार आहे. ईशाच्या बालपणीच्या आठवणी ती आशुतोषला सांगणार आहे. तर दुसरीकडे ईशाच्या साखरपुड्याची बोलणी करण्यासाठी अनिरुद्धनेदेखील आई आणि आप्पांसोबत जायला हवं होतं, असं अनघा अनिरुद्धला सांगताना दिसणार आहे. त्यावर मी तिथे जाऊन काय करू, माझं कुणी ऐकत नाही त्यामुळे मी घरीच राहिलो, असं अनिरुद्ध म्हणणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात संजना आणि अनिरुद्धमध्ये पुन्हा एकदा वाद होताना दिसणार आहे. दरम्यान अनिरुद्ध संजनाची माफी मागणार असून तो तिच्यासमोर त्याची बाजू मांडणार आहे. तर संजना आता मी पुन्हा फसणार नाही, असं स्पष्ट करेल. अनिरुद्ध संजनाची माफी मागत असला तरी त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झालेला नाही. त्यामुळे आता संजना त्याला तिच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देते. 

'आई कुठे काय करते' या मालिकेत मधुराणी प्रभूलकर, मिलिंग गवळी, रुपाली भोसले आणि ओंकार गोवर्धन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. 

संबंधित बातम्या

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या विचित्र वागण्यामुळे संजनाचा राग अनावर; 'आई कुठे काय करते !'च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
'भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं' पदवीधर निवडणूकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी अन् शिंदेसेनेवर हल्लाबोल
'भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं' पदवीधर निवडणूकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी अन् शिंदेसेनेवर हल्लाबोल
Embed widget