Aai Kuthe Kay Karte : संजनाच्या वाढदिवशी वीणाचं कौतुक केल्याने अनिरुद्धवर चिडली संजना; 'आई कुठे काय करते'च्या प्रोमोने वेधलं लक्ष
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'च्या आगामी भागात संजनाच्या वाढदिवशी वीणाचं कौतुक केल्याने संजना अनिरुद्धवर चिडलेली दिसणार आहे.
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेच्या आगामी भागात संजनाच्या वाढदिवशी वीणाचं कौतुक केल्याने संजना अनिरुद्धवर चिडलेली दिसणार आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार?
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आजच्या भागात संजनाचा वाढदिवस साजरा होताना दिसणार आहे. संजनाच्या वाढदिवसाची अरुंधती जय्यत तयारी करणार आहे. आपल्या संसार मोडलेल्या संजनाच्या वाढदिवसाचं अरुंधती चांगलच आयोजन करणार आहे. पण संजनाचा हा आनंद अनिरुद्ध मात्र टिकू देणार नाही.
अनिरुद्ध संजनाचा वाढदिवस पूर्णपणे विसरुन गेला आहे. घटस्फोट होणार असल्यामुळे तरी आपला वाढदिवस अनिरुद्धच्या लक्षात असेल अशी संजनाला आशा असते. पण अनिरुद्ध मात्र संजनाचा वाढदिवस पूर्णपणे विसरतो. अनिरुद्ध सोडून घरातील सर्व मंडळी संजनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.
View this post on Instagram
अनिरुद्ध मात्र संजनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा न देता वीणासोबत घरातून निघून जातो. त्यानंतर अरुंधती संजनासाठी खास वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करते. संजनाच्या वाढदिवानिमित्त देशमुखांचं घर सजतं. फुगे, केक, लाइट्स आणि भेटवस्तू पाहून संजनाला खूप आनंद होतो.
एकीकडे संजना आनंदी असताना अनिरुद्ध मात्र तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत वीणाला घेऊन येतो. त्यामुळे घरातील सर्व मंडळींना मोठा धक्का बसतो. आता अनिरुद्धचं हे वागणं पाहून संजना त्याच्यावर चिडणार आहे. आता वीणासमोर अनिरुद्धचा खरा चेहता येणार का? याकडे मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
'टीआरपी'च्या शर्यतीत धावेतय 'आई कुठे काय करते'ची गाडी
'टीआरपी'च्या शर्यतीत 'आई कुठे काय करते'ची गाडी धावताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीआरपी रिपोर्टमध्ये या मालिकेला 6.6 रेटिंग मिळालं आहे. तर टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे या मालिकेचा महाएपिसोडही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या विशेष भागाला 5.5 रेटिंग मिळाले आहे.
संबंधित बातम्या