Aai Kuthe Kay Karte: अनिशने अनिरुद्धला दिलं 'हे' वचन; 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो व्हायरल
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसते की, सगळ्यांसमोर अनिरुद्ध हा अनिशचा अपमान करत आहे.
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये अनेक ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. या मालिकेचा नुकताच एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसते की, सगळ्यांसमोर अनिरुद्ध हा अनिशचा अपमान करत आहे.
प्रोमोमध्ये दिसते की, अनिरुद्ध हा अनिशला म्हणतो, 'तुमचं लग्न झालेलं आहे. पण लग्न झालंय याचा अर्थ असा नाही की, ते लग्न टिकेलच. ईशा अजून लहान आहे. दोन चार तास तिला समजून घेणं आणि आयुष्यभर तिची काळजी घेणं यामध्ये खूप फरक आहे. मी ईशासाठी खूप स्वप्न बघितली होती. पण तू तिच्या आयुष्यात आल्यापासून ईशाला तिच्या स्वप्नांचा विसर पडला आहे.'
पुढे अनिरुद्ध हा अनिशला म्हणतो, 'तू मला का आवडत नाहीस? याची कारण हवी होती ना तुला मी तुला दोन मुख्य कारणं सांगतो.पहिलंसृ- तू नाटकी आहेस, तू बड्या घरचा मुलगा आहे. तुला कष्टाची सवय नाही. म्हणून हे लपवण्यासाठी तू हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की तू खूप कष्टाळू आहेस.दुसरं कारण अरुंधती आहे, तू आणि ईशा अरुंधतीसोबत राहणार आहात. जिथे अरुंधती आहे, तिथे ईशा कधीही राहू शकणार नाही.'
View this post on Instagram
अनिश अनिरुद्धला वचन देतो. तो म्हणतो, 'मी तुम्हाला वचन देतो की, मी लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभा राहतो. ते ही आई-वडिलांची मदत न घेता.' आता अनिश हा अनिरुद्धला दिलेलं वचन पूर्ण करेन की नाही? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
View this post on Instagram
आई कुठे काय करते या मालिकेमध्ये मधुराणी प्रभुलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात तर अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते मिलिंद गवळी हे साकारतात. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
इतर महत्वाच्या बातम्या: