(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाशचं सत्य नेहा सांगणार यशला
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य यशसमोर येणार आहे.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत परीचा ड्रायव्हर म्हणून नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री झाली आहे. मालिकेच्या आगामी भागात अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य यशसमोर येणार आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत प्रेक्षकांना नुकताच एक ट्विस्ट पाहायला मिळाला होता. अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य सिम्मीसमोर आलं होतं. सिम्मी याच गोष्टीचा फायदा घेऊन नेहाला त्रास देण्याचा प्रयत्न करताना दिसून आली. त्यामुळे नेहाच्या अडचणीत वाढ झाली. सिम्मीनंतर अविनाशचं सत्य बंडू काकूंना समजलं आहे.
प्रोमो आऊट
मालिकेचा नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये बंडू काका अविनाशला म्हणत आहेत, नेहा आज यशला सगळं सांगणार आहे. त्यावर अविनाश म्हणतो आहे, त्याआधीच मी परीला माझ्यासोबत घेऊन जाणार. त्यानंतर अविनाश परीकडे जातो तेव्हा परीसोबत यश असतो. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा रंगणार एक तासाचा विशेष भाग
येत्या रविवारी 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. दुपारी एक वाजता आणि रात्री आठ वाजता प्रेक्षकांना झी मराठीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचा एक तासाचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. या भागात नेहा अविनाश तिचा पहिला नवरा असल्याचे सत्य यशला सांगणार आहे. पहिल्या नवऱ्यामुळे नेहा आणि यशचा संसार फिस्कटणार का? परीला तिचे खरे बाबा कोण हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.
श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या