(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'टार्झन' फेम अभिनेता जो लाराचं विमान दुर्घटनेत निधन
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख जाहीर करण्यात आली.
मुंबई : 1990 मध्ये गाजेलल्या अत्यंत लोकप्रिय अशा टार्झन या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विलियम जोसेफ लारा, म्हणजेच जो लारा याचं विमान दुर्घटनेत निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी झालेल्या प्लेम क्रॅशमध्ये 58 वर्षीय जो यांची पत्नी आणि इतर काहीजणांचा मृत्यू ओढावला.
सूत्रांच्या माहितीनुसार जो यांच्यासह आणखी 6 जण या लहान जेटमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यानच हे जेट क्रॅश होऊन Nashville नजीक असणाऱ्या टेनेसी या तलावात पडलं. सदर दुर्घटनेनंतर या अपघाताची पूर्ण चौकशी करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. शिवाय पोलीस जो यांच्यासह इतर 6 जणांच्या मृतदेहाचा शोधही घेत आहेत. रविवारी रदरफोर्ड काऊंटी फायर रेस्क्यूचे कॅप्टन जॉन इंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेनंतर Smyrna जवळ पर्सी प्रीस्ट तलावात शोधमोहिम सुरु आहे. शिवाय या तलावाच्या आजुबाजूच्या परिसरातही दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेषही शोधण्यात येत आहेत.
शनिवारी या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख जाहीर करण्यात आली. ब्रांडन हाना, ग्वेन एस लारा, विलियम जे लारा, डेवि एल मार्टिन, जेनिफर जे मार्टिन, जेस्सिका वॉल्टर्स आणि जोनाथन वॉल्टर्स यांचा मृत्यू झाला. हे सर्व टेनेसी येथील ब्रेंटवूडचे रहिवासी होते अशी माहिती मिळत आहे.
IN PICS | कपूर कुटुंबातील आणखी एका सौंदर्यवतीच्या मादक अदांनी जिंकली चाहत्यांची मनं
दरम्यान, जो लारा यांच्या नावाला टार्झन या सीरिजमुळे कमालीची पसंती मिळाली होती. 1996 ते 1997 दरम्यान या सीरिजच्या एका पर्वाचं प्रसारण करण्यात आलं होतं. मॉडेलिंग पासून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या जो यांना पुढे जाऊन या सीरिजची ऑफर मिळाली होती. या सीरिजच्या 22 भागांत त्यांनी आपल्या अभिनयाची कला सादर केली. याव्यतिरिक्त त्यांनी साइबॉर्ग स्टील वॉरियर, स्टील फ्रंटियर, वॉरहेड, डूम्सडेयर आणि टीवी शोज बेवॉच, कोनान द अॅडवेंचररमध्येही काम केलं होतं.