एक्स्प्लोर

Marathi Actor : मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही, 'सैराट' फेम अभिनेत्याने मांडली स्पष्ट मतं, म्हणाला,'लिव्ह इन रिलेशनशिप ग्रेट वाटतं...'

Marathi Actor : सैराट फेम अभिनेत्याने त्याची लग्नाविषयीची आणि लिव्ह इन रिलेशनशिपविषयीची स्पष्ट मंत मांडली आहे. 

Tanaji Galgunde on Live in Relationship :  काही वर्षांपूर्वी आलेल्या सैराट (Sairat) हा सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. या सिनेमातून भेटीला आलेले सगळे नवखे कलाकार त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके झाले. आर्ची, परश्या, सल्या आणि लंडग्या यांच्या भूमिकेत रिंकु राजगुरु (Rinku Rajguru), आकाश ठोसर (Aakash Thosar), तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख ही मंडळी प्रकाशझोतात आलीत. त्यानंतर त्यांच्या करिअरला देखील चांगलीच कलाटणी मिळाली. यातील लंगड्या म्हणजे अभिनेता तानाजी गळगुंडे याने नुकतच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याची लग्नाविषयीची मतं मांडली आहेत. 

तानाजी हा सैराटनंतर गस्त, झुंड, माझा अगडबम, फ्रिट हिट दणका, एकदम कडक आणि घर बंदूक बिरयानी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामधील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांचीही मनं जिंकलीत. पण सध्या हा अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे या अभिनेत्याने त्याची लग्नाविषयीची मतं मांडली आहे. त्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे. 

तानाजीने काय म्हटलं?

तानाजीने नुकतीच आरपार ऑनलाईन या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने म्हटलं की, मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही. म्हणजे मी कदाचित आता खूप पुढे गेलो असेन पण मला आता पटतं ते लिव्ह इन रिलेशनशिप. एकतर ते लग्नाआधी बघायचं, त्या मुलीला आवडतोय की नाही माहित नाही आणि लग्न करायचं. सगळ्या लोकांनी एकत्र यायचं आणि एका दिवसासाठी का एवढं अवडंबर करायचा.

लिव्ह इन रिलेशनशिपच ग्रेट आहे - तानाजी

पुढे त्याने म्हटलं की, . तामजाम एवढा मोठा करायचा, 5-10 लाख रुपये खर्च करायचा. खर्च करुन वाजत गाजत वरात काढायची, नाचायचं बँड बाजा लावून. चांगली गोष्ट आहे, नाचू आपण पण एखादी छोटीशी पार्टी करावी, असं मला वाटतं. जर लग्न करायचंच आहे आता माझा विचार वेगळा आहे की मला लिव्ह इन रिलेशनशिप हे ग्रेट वाटतं. पण लग्न करायचं तर मग ते रजिस्टर करावं असं मला वाटतं. जास्त खर्च नाही, 2-4 हजारांत लग्न झालं, हार तुरे घातले बास झालं.                   

ही बातमी वाचा : 

Bai G marathi Movie : एकाच जन्मात नवरा बायकोला कंटाळतो पण..., वटपौर्णिमेच्या दिवशी 'बाई गं' सिनेमाचा टीझर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kedar Dighe on Dharmaveer 2 : दिघेंना संपवण्यात आलं?शिरसाटांच्या  दाव्यावर केदार दिघे काय म्हणाले?Sanjay Shirsat On Anand Dighe Death : आनंद दिघेंना मारलं गेलं, ठाणे जिल्ह्याला माहिती -शिरसाटAaditya Thackeray : सिनेटप्रमाणेच विधानसभेतही मोठा विजय मिळवणार : आदित्य ठाकरेVarun Sardesai on Senate Election: आमचीच खरी युवासेना हे सिद्ध झालं : वरुण सरदेसाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
Election Commission : 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
Pravin Tarde: 'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
Embed widget