एक्स्प्लोर

Tamasha Live : प्रत्येक पात्राची ओळख गाण्याच्या माध्यमातून, ‘तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा!  

Tamasha Live : संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा (Tamasha Live) सांगीतिक नजराणा येत्या 15 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाचे संगीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

Tamasha Live : संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा (Tamasha Live) सांगीतिक नजराणा येत्या 15 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाचे संगीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्यात सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), सचित पाटील (Sachit Patil), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यांच्या नृत्यसादरीकरणाने कार्यक्रमाला चारचाँद लावले. यावेळी चित्रपटातील कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी ‘चित्रपटाची नांदी’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्या गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर, आता इतरही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. ‘बातमीची वारी’, ‘फड लागलाय’, ‘वाघ आला’, ‘लाथ घालणार’, ‘रंग लागला’, ‘कडकलक्ष्मी’, ‘गरमा गरम घ्या’, ‘झुंज लागली’, ‘वासुदेव’, ‘जाऊ कशी माघारी’, ‘जखम जहरी’, ‘गंमत गड्या’ अशा अनेक गाण्यांची सांगीतिक मैफल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रत्येक पात्राची ओळख गाण्याच्या माध्यमातून

अमितराज व पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. हे श्रवणीय संगीत चित्रपटाच्या कथेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे आहे. प्रत्येक पात्राची ओळख ही गाण्याच्या माध्यमातून होत असून, अशा प्रकारचा प्रयोग मराठी चित्रपटात पहिल्यांदाच होत आहे. मुख्य म्हणजे सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील हे पहिल्यांदा 'तमाशा लाईव्ह' चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच गायले आहेत. प्रेक्षकांना चित्रपटात काही विशिष्ट शैलीची गाणी ऐकायला मिळणार आहेत. रॅप, रोमँटिक असे गाण्यांचे विविध प्रकार यात असून, नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.

या विषयी सांगताना 'तमाशा लाईव्ह'चे दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात की, ‘हल्ली मराठी चित्रपटांमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग 'तमाशा लाईव्ह'मध्ये करण्यात आला आहे. पारंपरिक संगीताला आधुनिकतेचा साज देण्यात आला आहे. त्यामुळे हे संगीत तरुणाईलाही भावणारे आहे. या चित्रपटाच्या संगीताची टीम इतकी जबरदस्त आहे. याचा अनुभव गाणी ऐकताना रसिकांना येईलच.’

प्रत्येक गाणं वेगळ्या शैलीचं!

गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, ‘चित्रपटात बरीच गाणी असली तरी प्रत्येक गाणं वेगळ्या शैलीचे आहे. हे वास्तववादी कथा सांगणारं संगीत आहे, जे आजच्या काळाचे प्रतिनिधित्व करणारे आहे.’ तर, संगीतकार अमितराज, पंकज पडघन म्हणतात, ‘प्रत्येक गाण्याला साजेसे असे संगीत आम्ही त्याला दिले आहे. ही संकल्पनाच इतकी अनोखी आहे, की यावर वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी आम्हाला यानिमित्ताने मिळाली.’

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘संजय जाधव प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी हटके आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या चित्रपटाचा विषय, संकल्पना नेहमीच वेगळी असते. हा चित्रपट म्हणजे संगीतप्रेमींसाठी पर्वणी आहे. कथेला पुढे घेऊन जाणारे हे संगीत आहे, हा नवीन प्रयोग प्रेक्षकांना नक्की आवडेल.’

‘प्लॅनेट मराठी’ व ‘माऊली प्रॉडक्शन’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मित 'तमाशा लाईव्ह'ची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून, संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

संबंधित बातम्या

Tamasha Live : सिनेप्रेक्षकांसाठी खूशखबर! 'तमाशा लाईव्ह'मधील 'नांदी' गाणं प्रदर्शित

Tamasha Live : 'तमाशा लाईव्ह' चा टीझर रिलीज; सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
Lagna Ani Barach Kahi: Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Ketaki Chitale on Nana Patekar: 'नाना मला ओरडले होते...' मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितला किस्सा; तिच्यासाठी कोणता निर्णय घेतला होता?
'नाना मला ओरडले होते...' मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितला किस्सा; तिच्यासाठी कोणता निर्णय घेतला होता?
Mohini Premachi Filmy Kahani: 'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Embed widget