Chiki Chiki Booboom Boom : जिलबीनंतर स्वप्नील जोशी 'चिकी चिकी बुबूम बुम'मधून सर्वांना खळखळून हसवणार; टीझर पाहिलात?
Chiki Chiki Booboom Boom : स्वप्नील जोशी कायम वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना दिसतो आणि अशातच चित्रपटाच्या कथेसोबत तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका तेवढ्याच ताकदीनं साकारून त्यांना योग्य तो न्याय देतो.

Chiki Chiki Booboom Boom Movie Teaser: नव्या वर्षाची सुरुवात स्वप्नील जोशीनं (Swapnil Joshi) गूढ आणि गोड जिलबी सोबत केली आणि आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हसवून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्वप्नीलनं नव्या वर्षात चिकी चिकी बुबूम बुम (Chiki Chiki Booboom Boom) चित्रपटाची घोषणा केल्यानंतर आता तो या चित्रपटात एक विनोदवीर पात्र साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाच्या टीझरमध्ये स्वप्नील वैभवची भूमिका साकारणार असून, हे पात्र आता चित्रपटगृहात काय धिंगाणा घालणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
स्वप्नील जोशी कायम वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करताना दिसतो आणि अशातच चित्रपटाच्या कथेसोबत तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका तेवढ्याच ताकदीनं साकारून त्यांना योग्य तो न्याय देतो. भूमिका कुठली ही असो, स्वप्नील ती भूमिका साकारण्याचं आव्हान पेलून तिला किती उत्तम बनवता येईल, याकडे लक्ष देऊन काम करतो.
जिलबी मधला रांगडा करारी लूक असलेला पोलीस अधिकारी ते चिकी चिकी बुबूम बुम मधला सगळ्यांचा खदखदून हसून मनोरंजन करणारा स्वप्नील, वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारा स्वप्नील हा कोणत्याही भूमिकेत तितकाच लक्षवेधी ठरतो, यात शंका नाही.
View this post on Instagram
दरम्यान, जिलबी, चिकी चिकी बुबूम बुमनंतर स्वप्नील सुशीला-सुजीत, शुभचिंतक या चित्रपटात देखील काहीतरी खास घेऊन येणार आहे आणि याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या 'चिकी चिकी बुबूम बूम' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचे निमति सुनील नारकर असून सहनिर्मात सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'ही' मराठी अभिनेत्री नवऱ्यासोबत करतेय सेंद्रिय शेती, महिन्याला अवघ्या 2000 रुपयांत चालवते संसार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

