एक्स्प्लोर

Swanandi Titkekar and Ashish Kulkarni : प्राजक्ताच्या फुलांनी सजली स्वानंदी आशिषच्या घराची नेमप्लेट, फोटो शेअर करत म्हणाली...

Swanandi Titkekar and Ashish Kulkarni : अभिनेत्री स्वानंदी टीकेकर ही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तिने नुकतच तिच्या घराच्या नेमप्लेटचे फोटो शेअर केले आहेत.

Swanandi Titkekar and Ashish Kulkarni : काही दिवसांपासून सिनेसृष्टीत कलाकार मंडळींच्या लग्नाचे सोहळे रंगत आहेत. नुकतच अभिनेत्री तितिक्षा तावडे हीने देखील अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं सांगितलं. याआधी अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर, पियुष रानडे आणि सुरुची अडारकर यांनी देखील लग्नगाठ बांधली. त्यातलीच एक जोडपं म्हणजे अभिनेत्री स्वानंदी टीकेकर (Swanandi Tikekar) आणि गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) आहेत. या दोघांनीही 25 डिसेंबर 2023 रोजी पुण्यात लग्न केलं. लग्नानंतर अनेकांनी त्यांच्या घरामध्ये अनेक बदल केलं, काही नवीन गोष्टींची खरेदी केली. स्वानंदीने देखील सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

अभिनेत्री स्वानंदी टीकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी हे काही दिवासंपूर्वी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या पोस्टवर देखील चाहत्यांनी आणि त्यांच्या मित्रमैणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. स्वानंदी आणि आशिषने त्यांच्या संसाराला सुरुवात केली असून नुकतच स्वानंदीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन घराच्या नेमप्लेटचे फोटो शेअर केले आहेत. 

स्वानंदीच्या घराची नेमप्लेट

अभिनेत्री स्वानंदी टीकेकर हीने तिच्या घराच्या नेमप्लेटचे फोटो शेअर केले आहेत. अगदी साधी आणि सरळ असणारी ही नेमप्लेट सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. या नेमप्लेटमध्ये स्वानंदी आणि आशिष या दोघांच्याही नावाचा समावेश आहे. तसेच प्राजक्ताची फुलं देखील या नेमप्लेटवर आहे. तसेच स्वानंदीने तिच्या आवडीनुसार ही नेमप्लेट तयार करुन घेतली आहे. ही पोस्ट शेअर करताना स्वानंदीने म्हटलं की, ही नेमप्लेट पाहून मला जशी हवी आहे, तशीच आहे असंच वाटलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)

छोट्या पडदा गाजवलेली स्वानंदी

स्वानंदी ही अभिनेता उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि गायिका आरती अंकलीकर (Arati Ankalikar-Tikekar) यांची मुलगी आहे.  स्वानंदीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा, असं माहेर नको गं बाई, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? या मालिकांमध्ये काम केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत तिनं साकारलेल्या मिनल या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.   

स्वानंदीच्या नवऱ्याने गाजवलंय 'Indian Idol'

स्वानंदीचा पती अर्थात आशिष कुलकर्णी हा एक उत्तम गायक आहे. 2008 साली 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमात आशिष सहभागी झाला होता. त्याचा ‘रॅगलॉजिक’ नावाचा म्युझिक ब्रॅंड आहे. आशिषने 'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) गाजवलं आहे. अनेक मराठी सिनेमांसाठी त्याने गाणी गायली आहेत.

ही बातमी वाचा : 

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni : नांदा सौख्यभरे! स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा लग्नसोहळा, सहजीवनाचा 'आनंदी' प्रवास सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Thane : राज ठाकरेंना शिंदेंच्या लेकाकडून खास गिफ्ट, राज-दिघेंच्या फोटोची फ्रेमRaj Thackeray Anand Ashram Video : 19 वर्षांनी आनंदाश्रमात पहिलं पाऊल, राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओRaj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Embed widget