एक्स्प्लोर

Suraj Chavan Wants To Work With Allu Arjun: 'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...', सूरज चव्हाणला लागलेत साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'

Suraj Chavan Wants To Work With Allu Arjun: सूरज चव्हाणनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करायची इच्छा बोलून दाखवली, तसेच, माझा लूक दाक्षिणात्य लोकांसारखा आहे. सयाजी शिंदेंशी माझी ओळख झाली, तर मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नक्कीच जाईन, असंही तो म्हणाला आहे. 

Suraj Chavan Wants To Work With Allu Arjun: 'बिग बॉस मराठी 5'च्या (Bigg Boss Marathi) ट्रॉफीवर आपलं नाव कोरून महाराष्ट्राच्या (Maharashtra News) घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजे, गुलिगत स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan). अगदी साध्या आणि गरीब परिस्थितीतून आलेल्या सूरजला अख्ख्या महाराष्ट्रानं सपोर्ट दिला आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं. मराठी रिअॅलिटी शो (Marathi Reality Shows) जिंकला, मराठी सिनेमाही (Marathi Movies) केला अशातच आता महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असलेल्या गुलिगत स्टार सूरज चव्हाणला साऊथ फिल्म इंडस्ट्रीत जाण्याचे वेध लागलेत. तशी इच्छाही त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना बोलून दाखवली आहे. 

'बिग बॉस मराठी 5'ची ट्रॉफी उंचावल्यानंतर मराठीतले सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण घेऊन सिनेमा केला. सूरजचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरीसुद्धा त्याची चर्चा मात्र खूप झाली. सूरज चव्हाणनं केदार शिंदेंच्या 'झापुक झुपूक' या सिनेमात मुख्य भूमिका साकारलेली. आता मात्र, सूरजला साऊथ इंडस्ट्रीत काम करायचंय. अल्लू अर्जुन एकच सिनेमा करतो, पण काम भारी करतो, तसंच मी एकदाच काम करतो आणि टॉपचं काम करतो, असं सूरज चव्हाण म्हणतोय. 

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेता सूरज चव्हाणनं नुकतीच 'हॉट सीट टॉक्स' हा युट्युब चॅनलला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत बोलताना सूरज चव्हाणला त्याच्या करिअरमधील भविष्याच्या प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आलं. यावर सूरज चव्हाणनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करायची इच्छा बोलून दाखवली, तसेच, माझा लूक दाक्षिणात्य लोकांसारखा आहे. सयाजी शिंदेंशी माझी ओळख झाली, तर मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नक्कीच जाईन, असंही तो म्हणाला आहे. 

सूरज चव्हाण नेमकं काय म्हणाला? (Suraj Chavan On South Film Industry)

बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण मुलाखतीत बोलताना म्हणाला की, "मला दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करायचंय आणि माझी खूप इच्छा आहे, मी ते करणार... मला एकदा तरी दाक्षिणात्य सिनेमात काम करायचंय. मला दाक्षिणात्य इंडस्ट्री खूप आवडते. तिथल्या सिनेमातली अॅक्शन खूप आवडते. ते सिनेमे बघून मीसुद्धा तशी अॅक्शन केलीय... 'बिग बॉस'च्या घरात मी असं केलं होतं... 'बिग बॉस'च्या घरात कुणीतरी मला 'जंगली' म्हटलं होतं. मी गावठी आहे, पण मी कुणाला आवडत नाही. एका टास्कमध्ये निक्की आणि जान्हवी 'अरबाज सूरज आलाय', असं ओरडत होती. सूरज चव्हाण म्हणजे वादळ आहे..."

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील कोणता अभिनेता आवडतो? असं मुलाखतीत बोलताना विचारलं, त्यावेळी सूरज चव्हाण म्हणाला की, "मला अल्लू अर्जुन आवडतो... त्याच्याबरोबर मला काम कारायचंय. त्याचे सिनेमे जरा वेगळेच असतात. तो एकच सिनेमा करतो, पण काम भारी करतो... तसं माझंपण आहे... मी एकदाच काम करतो आणि टॉपचं काम करतो... आईची इच्छा असल्यावर सगळं होईल..."

"माझा लूक दाक्षिणात्य लोकांसारखा आहे. सयाजी शिंदेंशी काही संपर्क झाला, तर बघू... एकदा त्यांच्याशी माझी ओळख झाली, तर मी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नक्कीच जाईन... ते मला ओळखत असणार, पण एकदा त्यांचा नंबर मिळाला तर काम होईल...", असंही सूरज चव्हाण म्हणाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prajakta Mali Photos: 15 दिवसांच्या 'डिजिटल डिटॉक्स'नंतर प्राजक्ता माळीचं कमबॅक; ग्लॅमरस अंदाजात म्हणाली, 'Real Me'

महत्त्वाच्या बातम्या

CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Bollywood Actress Ananya Raj Death: गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राजनं घेतला जगाचा निरोप, पण मृत्यूचं कारण नेमकं काय? धक्कादायक बाब समोर!
गाढ झोपेत अभिनेत्री अनन्या राजचा मृत्यू, सिनेविश्वात खळबळ, मृत्यूचं हादरवणारं कारण समोर!

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Embed widget