एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Fame Suraj Chavan Video: सूरज चव्हाणचं जमलं? साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांना दिलाय 'गुलिगत धोका' VIDEO

Bigg Boss Marathi Fame Suraj Chavan Video: इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूरज मुलगी पाहायला जातो. तिच्या प्रेमात पडतो आणि दोघांचा साखरपुडा होतो.

Bigg Boss Marathi Fame Suraj Chavan Video: 'बिग बॉस'मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाच्या विजेता सूरज चव्हाणवर (Suraj Chavhan) चाहत्यांकडून नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. काही दिवसांपूर्वीच सूरज चव्हाणनं मराठी सिनेसृष्टीत मुख्य अभिनेता म्हणून डेब्यू केला. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) सिनेमाची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली होती. अशातच आता पुन्हा एकदा सूरज चव्हाण चर्चेत आला आहे, तो त्यानं शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओमुळे. सूरज चव्हाणचा नवा व्हिडीओ पाहून चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला. व्हिडीओवरुन सूरजला त्याच्या स्वप्नातली परी मिळाल्याचं दिसतंय. त्यानं आपल्या होणाऱ्या बायकोची झलकही चाहत्यांना व्हिडीओतून दाखवली आहे. व्हिडीओ पाहून चाहते खूश झाले आहेत. पण, व्हिडीओच्या शेवटी मात्र चाहत्यांना सूरजनं जोरदार धक्का दिला आहे.  

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूरज मुलगी पाहायला जातो. सूरज अगदी सुटाबुटात मुलीच्या घरी जातो. त्याच्यासोबत त्याची बहीणसुद्धा आहे. मुलीच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम होतो. मुलगी सूरजला पाणी घेऊन येते आणि दोघांची नजरानजर होते. दोघेही पाहताच क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. लगेचच दोघांचा साखरपुडा होतो. दोघेही एकमेकांना अंगठी घालतात. सूरजचा साखरपुडा झाल्यामुळे चाहते खूपच खूश झाले. पण, तेवढ्यात येतो सूरजच्या व्हिडीओतला ट्वीस्ट. सूरज चव्हाणच्या साखरपुड्यामुळे आनंदी झालेल्या चाहत्यांचा आनंद फार काळ टिकत नाही. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

खरं तर सूरजचा साखरपुडा झालेला नाही. व्हिडीओची सुरुवात पाहून सगळ्यांना असंच वाटलं होतं. मात्र, व्हिडीओच्या शेवटी सूरज स्वप्न बघत असल्याचं व्हिडीओत दिसलं. त्यामुळे सूरजसोबतच चाहत्यांचाही भ्रमनिरास झाला. सूरजच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. सूरजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

दरम्यान, सूरज चव्हाणनं 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. महाराष्ट्रानं सूरजला अक्षरशः उचलून धरलेलं. बिग बॉसची ट्रॉफी उंचावल्यावर त्याच मंचावर सूरजला सिनेमाची ऑफर मिळाली होती. स्वतः दिग्दर्शक केदार शिंदेंनी सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात सूरजसोबत मोठी स्टारकास्ट झळकली होती. अखेर सूरजचा सिनेमा रिलीज करण्यात आला. पण, या सिनेमाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Casting Couch Experience: 'सोबत झोपण्यासाठी तयार...?'; टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून दिग्दर्शकाची 'ती' अत्यंत घाणेरडी मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Embed widget